Team India : IPL 2023 संपली अन् टीम इंडियाच्या 'या' 3 खेळाडूंची कारकीर्दही मावळली

 Team India   IPL 2023
Team India IPL 2023
Updated on

Team India : आयपीएल 2023 चा धमाकेदार हंगाम संपला आहे आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पाचव्यांदा IPL ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल 2023 सीझन संपल्यानंतर टीम इंडियाच्या 3 क्रिकेटर्सची आयपीएल कारकीर्द जवळपास संपल्याचे मानले जात आहे. या हंगामातील खराब कामगिरीनंतर आता पुढील आयपीएल 2024 हंगामात या 3 भारतीय खेळाडूंची कारकीर्द संपुष्टात येईल असे दिसत आहे.

 Team India   IPL 2023
Team India WTC Final: टीम इंडियाची WTC फायनलसाठी ही असेल प्लेइंग-11! कर्णधार रोहित या खेळाडूना देणार संधी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच मनीष पांडेची आयपीएल कारकीर्दही संपण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आयपीएल 2023 मध्ये मनीष पांडे 10 सामन्यांमध्ये 17.78 च्या अत्यंत खराब सरासरीने केवळ 160 धावा करू शकला. मनीष पांडेची आयपीएल 2023 मधील कामगिरी खूपच निराशाजनक आहे. मनीष पांडे आयपीएल 2023 मध्ये संघात होता की नाही याचा दिल्ली कॅपिटल्सला काही फरक पडला नाही. दिल्ली कॅपिटल्सने यावर्षी मनीष पांडेवर खूप विश्वास दाखवला होता आणि त्याला त्यांच्या संघात देखील समाविष्ट केले होते, परंतु त्याने तो विश्वास तोडला आहे.

 Team India   IPL 2023
WTC Final 2023: टीम इंडियाला टी-20 मधून कसोटीत जुळवून घेण्याची `कसोटी`

आयपीएल 2023 मध्ये मनदीप सिंग 3 सामन्यांमध्ये 4.67 च्या अत्यंत खराब सरासरीने केवळ 14 धावा करू शकला. आयपीएल 2023 मध्ये क्वचितच कोणत्याही फलंदाजाने इतकी खराब कामगिरी केली असेल. मनदीप सिंगला आयपीएल 2023 च्या मोसमात आतापर्यंत केवळ 2, 0 आणि 12 धावा करता आल्या आहेत.

31 वर्षीय फलंदाज मनदीप सिंगला आयपीएलमध्ये अनेक संधी मिळाल्या आहेत, त्या त्याने वाया घालवल्या आहेत. आयपीएल 2023 मधील या फ्लॉप शोनंतर मनदीप सिंगची आयपीएल कारकीर्द या सीझनमध्ये संपुष्टात येताना दिसत आहे. मनदीप सिंगची ही खराब कामगिरी पाहून पुढच्या वर्षी आयपीएलचा कोणताही संघ त्याला सामील करू इच्छित नाही.

 Team India   IPL 2023
WTC : के. एस. भारत, उमेश यादवला पसंती द्या - सरणदीप सिंग

टीम इंडिया मधील फ्लॉप शोनंतर मयंक अग्रवालची आयपीएल कारकीर्द या सीझनमध्ये संपत असल्याचे दिसत आहे. खराब कामगिरीमुळे मयंक अग्रवालला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. आयपीएल 2023 मध्ये मयंक अग्रवाल 10 सामन्यांमध्ये 27.00 च्या अत्यंत खराब सरासरीने केवळ 270 धावा करू शकला.

मयंक अग्रवाल आयपीएल 2023 हंगामा सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत होता, परंतु तो फ्लॉप ठरला. या खराब कामगिरीच्या जोरावर आयपीएलचा कोणताही संघ पुढील वर्षी मयंक अग्रवालला सामील करू इच्छित नाही. मयंक अग्रवालला आयपीएल 2023 च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने विकत घेतले होते, त्यानंतरही त्याचा फ्लॉप शो सुरूच होता. याआधी मयंक अग्रवालला त्याच्या खराब कामगिरीमुळे पंजाब किंग्ज संघाने कर्णधारपदावरून काढून टाकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.