GT vs CSK IPL 2023 : ऋतुराजच्या 13 चेंडूत 70 धावा! तरी पांड्याच्या गुजरातने चेन्नईच्या मुसक्या आवळल्या

IPL 2023 GT vs CSK Ruturaj Gaikwad
IPL 2023 GT vs CSK Ruturaj Gaikwadesakal
Updated on

IPL 2023 GT vs CSK : आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 92 धावा चोपल्या. त्याने 9 षटकार आणि 4 चौकार मारत 13 चेंडूतच 70 धावा ठोकल्या. मात्र चेन्नईच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. दमदार सुरूवात करणाऱ्या चेन्नईच्या गुजरातने नंतर मुसक्या आवळल्या. चेन्नईने 20 षटकात 7 बाद 178 धावा करत गुजरातसमोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवले.

IPL 2023 GT vs CSK Ruturaj Gaikwad
IPL 2023 GT vs CSK : गतविजेत्या गुजरातची विजयी सुरूवात; चेन्नईची कडवी झुंज मोडून काढत जिंकला सामना

गुजरात विरूद्ध चेन्नई विरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने चांगलेच दमवले. त्याने पॉवर प्लेमध्ये दमदार फलंदाजी करत सीएसकेचा धावफलक चांगलाच हलता ठेवला. मात्र डेवॉन कॉन्वे (1), मोईन अली (23), बेन स्टोक्स (7) आणि अंबाती रायुडू (12) यांना फारशी चमक दाखवता आली नाही.

सीएसकेचे फलंदाज चांगली सुरूवात करून बाद होत असताना दुसऱ्या बाजूने ऋतुराज मात्र खेळपट्टीवर स्थिरावला. त्याने सीएसकेचे 11 व्या षटकात शतक धावफलकावर लावले. यात त्याच्या 70 धावांचा मोठा वाटा होता. विशेष म्हणजे ऋतुराजने गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला त्याच्या पहिल्या दोन षटकात चांगलेच चोपले. ऋतुराजने हंगामातील पहिला चौकार आणि पहिला षटकार हा हार्दिकच्या गोलंदाजीवरच मारला.

IPL 2023 GT vs CSK Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad : दोन षटकात चोपल्या 24 धावा ! संधी नाकारणाऱ्या पांड्याला ऋतुराजने दिले चोख प्रत्युत्तर

चेन्नईचा ऋतुराज जरी 200 च्या स्ट्राईक रेटने धावा करत असला तरी दुसऱ्या बाजूने इतर फलंदाज हजेरी लावून जात होते. त्यामुळे चेन्नईची धावगती 10 व्या षटकानंतर मंदवाण्यास सुरूवात झाली. चेन्नईने 15 षटकात 133 धावांपर्यंत मजल मारली होती. यानंतर ऋतुराजने डावाची सूत्रे हातात घेत संघाला 18 व्या षटकात 150 चा टप्पा गाठून दिला. मात्र तो 50 चेंडूत 92 धावा करून बाद झाला.

यानंतर जडेजाही 1 धावेची भर घालून परतला. आता कर्णधार धोनीवरच धावांची गती वाढवण्याची जबाबदारी होती. धोनीने शेवटच्या षटकात 13 धावा केल्या. त्यामुळे गुजरातसमोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान उभे राहिले.

(Sports Latest News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.