LSG vs DC Kyle Mayers : मेयर्सने दिल्लीला भरवली धडकी, अखेर अक्षरने केली दांडू गुल अन् खलीलचा जीव भांड्यात

LSG vs DC Kyle Mayers
LSG vs DC Kyle Mayersesakal
Updated on

LSG vs DC Kyle Mayers : आयपीएल 2023 मध्ये आज दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्स घरच्या मौदानावर आपला पहिला सामना खेळत आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम लखनौला फलंदाजीला पाचारण केले. लखनौचा कर्णधार केएल राहुलने वेस्ट इंडीजच्या कायल मेयर्ससोबत सलामी दिली. मायर्सचा हा आयपीएलमधील पहिलाच सामना होता.

LSG vs DC Kyle Mayers
PBKS vs KKR : अर्शदीपने केकेआरला करायला लावला भांगडा; पंजाबला पाऊसही रोखू शकला नाही

मात्र या पहिल्याच सामन्यात मेयर्सने आपली ताकद दाखवून दिली. त्याने दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाची यथेच्छ धुलाई करत आपली गुणवत्ता पहिल्याच सामन्यात जगमासमोर ठेवली. मेयर्सने अवघ्या 38 चेंडूत 73 धावांची तुफानी खेळी करत लखनौला 12 व्या षटकात शतकी मजल मारून दिली. मात्र मेयर्सची ही 7 षटकार आणि 2 चौकारांनी सजलेली खेळी अखेर अक्षर पटेलने संपवली. अक्षरने मेयर्सचा त्रिफळा उडवताच खलील अहमदचा जीव भांड्यात पडला. कारण खलीलने मेयर्सला 14 धावांवर असताना झेल सोडत जीवनदान दिले होते.

LSG vs DC Kyle Mayers
Ruturaj Gaikwad : भारतीय संघ नक्कीच.. ऋतुराजच्या खेळीने डोळे उघडलेल्या हार्दिक पांड्याचे मोठं वक्तव्य

मेयर्स बाद झाल्यानंतर लखनौची धावगती मंदावली. खलील अहमदने आपली फिल्डिंगमधील चूक गोलंदाजीत भरून काढत मार्कस स्टॉयनिसला 12 तर धोकादायक निकोलस पूरनला 36 धावांवर बाद केले. मात्र दुसऱ्या बाजूने कृणल पांड्या सावध फलंदाजी करत होता. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या आयुष बदोनीने शेवटच्या षटकात चेतन साकरियाला दोन षटकार मारत लखनौ सुपर जायंट्सला 20 षटकात 193 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.