IPL 2023 : आधी अंधारामुळे आता पावसामुळे केकेआरची अवस्था झाली बिकट

IPL 2023 : आधी अंधारामुळे आता पावसामुळे केकेआरची अवस्था झाली बिकट
Updated on

IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने 20 षटकात 191 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून राजपक्षेने 32 चेंडूत 50 तर कर्णधार शिखर धवनने 29 चेंडूत 40 धावा ठोकल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, पंजाबचे 191 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरण्याच्या तयारीत असलेल्या केकेआरला मैदानावर उतरण्यात जवळपास अर्धा तास उशीर झाला. यात केकेआरचा काही दोष नव्हता.

IPL 2023 : आधी अंधारामुळे आता पावसामुळे केकेआरची अवस्था झाली बिकट
Ruturaj Gaikwad : भारतीय संघ नक्कीच.. ऋतुराजच्या खेळीने डोळे उघडलेल्या हार्दिक पांड्याचे मोठं वक्तव्य

पंजाब किंग्जने आपला डाव संपवल्यानंतर जवळपास अर्धा तास सामना थांबला होता. नियमानुसार दुसरी इनिंग ही 10 मिनिटात सुरू होणे आवश्यक असते. मात्र केकेआर आणि पीबीकेएस विरूद्धचा सामना जवळापस अर्धा तास सुरू झाला नव्हता. सामना सुरू असलेल्या मोहालीमधील आय. एस. बिंद्रा स्टेडियमवरील फ्लड लाईढ सुरू होण्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने जवळपास 15 मिनिटे उशीर झाला. यानंतर खेळाडू मैदानाबाहेर गेले. त्यानंतर काही वेळाने फ्लडलाईट्स सुरू झाल्या आणि सामना देखील सुरू झाला.

IPL 2023 : आधी अंधारामुळे आता पावसामुळे केकेआरची अवस्था झाली बिकट
PBKS vs KKR : अर्शदीपने केकेआरला करायला लावला भांगडा; पंजाबला पाऊसही रोखू शकला नाही

दरम्यान, सामन्याला अर्धा तास उशीर झाल्याचा फटका पुढेही बसला. सामन्याची 16 षटके झाली असताना पावसाला सुरूवात झाली. खेळ थांबला त्यावेळी केकेआरने पंजाबच्या 191 धावांच्या प्रत्युत्तरात 16 षटकात 7 बाद 146 धावा केल्या होत्या. त्यांना अजून विजयासाठी 24 चेंडूत 46 धावंची गरज होती.

(Sports Latest News)

हेही वाचा : महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.