IPL 2023 Mini Auction : टीम इंडिया सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्याच वेळी आयपीएलच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 23 डिसेंबरला कोची येथे आयोजित करण्यात आला होता. या आयपीएल लिलावात टीम इंडियाच्या एका खेळाडूला मोठा धक्का बसला आहे. या खेळाडूसाठी कोणतेही खरेदीदार सापडले नाहीत. हा खेळाडू बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या संघाचा एक भाग आहे.
आयपीएल 2023 चा लिलाव ऐतिहासिक ठरला. यावेळी लिलावात विक्रमी पैशांचा पाऊस पडला, पण टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिमन्यू ईश्वरनला खरेदीदार मिळू शकला नाही. अभिमन्यूवर कोणत्याही संघाने सट्टा खेळला नाही आणि तो न विकल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. अभिमन्यू ईश्वरन सध्या बांगलादेश दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग आहे.
नियमित कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीनंतर अभिमन्यूला बांगलादेश दौऱ्यावर स्थान मिळाले आहे. अभिमन्यू ईश्वरन या मालिकेत खेळताना दिसला नाही. त्याला दोन्ही सामन्यांच्या प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळवता आले नाही. या मालिकेपूर्वीही अभिमन्यू ईश्वरन अनेक प्रसंगी टीम इंडियाचा भाग बनू शकला आहे, परंतु त्याला अद्याप पदार्पण सामना खेळाला मिळालेला नाही.
अभिमन्यू ईश्वरन देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. गेल्या काही मोसमातही त्याने चमकदार कामगिरी केली आहे, मात्र तो अद्याप भारतासाठी एकही सामना खेळू शकलेला नाही. अभिमन्यू ईश्वरनने आतापर्यंत 70 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 43.22 च्या सरासरीने 4841 धावा केल्या आहेत, ज्यात 15 शतके आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 233 आहे आणि त्याने लिस्ट-ए आणि देशांतर्गत टी20 सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.