IPL 2023 Auction: आयपीएल लिलावामुळे सख्या भावांच्या घरात इकडे आनंद दुसरीकडे दुःख

आयपीएल 2023 च्या लिलावात एक भाऊ झाला करोडपती तर दुसरा...
IPL 2023 Auction Players Full List
IPL 2023 Auction Players Full Listsakal
Updated on

IPL 2023 Auction Players Full List : आयपीएल लिलाव 2023 अनेक खेळाडूंसाठी संस्मरणीय ठरला आहे. यावेळी पंजाब किंग्ज संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावून चाहत्यांना आश्चर्यचकित केले, तर अनेक दिग्गज खेळाडू या लिलावात न विकले गेले. पण या लिलावाने घरासाठी सुखासोबतच दु:खही आले आहे याचे कारण म्हणजे एका भावाने करोडोंची कमाई करून आयपीएलच्या इतिहासात आपले नाव कोरले तर दुसरा अपयशी राहिला.

IPL 2023 Auction Players Full List
IPL 2023 : बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या 'या' खेळाडूचे करियर सुरू होण्याआधीच संपले? कोणीच लावली नाही बोली...

पंजाब किंग्जने इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करनला विकत घेण्यासाठी 18.5 कोटी रुपये खर्च केले आहेत, ही आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी बोली आहे. यापूर्वी लिलावात क्रिस मॉरिस (16.25 कोटी) सर्वात महाग विकला गेला होता. या लिलावानंतर सॅम करन देखील खूप आनंदी दिसत होते, परंतु सॅम करनचा भाऊ टॉम करन या लिलावात अनसोल्ड राहिला.

IPL 2023 Auction Players Full List
Sam Curran : 'काल रात्री मी जास्त...' IPLमध्ये मालामाल झाल्यानंतर सॅम करणचे मोठे वक्तव्य

टॉम करन सॅम करनपेक्षा वयाने मोठा आहे. तो या लिलावात 75 लाखांच्या मूळ किंमतीसह उतरला होता, परंतु या लिलावात कोणताही संघाने त्याच्यावर रुची दाखवली नाही. टॉम करन आतापर्यंत 3 आयपीएल सीझनचा भाग आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 13 सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या 13 बळी आहेत. तो राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली संघाचा भाग आहे.

IPL 2023 Auction Players Full List
Lionel Messi Jersey Jay Shah: घरी बसल्या बसल्या जय शहाला मिळाली 'मेस्सीची जर्सी'; फोटो व्हायरल...

सॅम करनने 2019 मध्ये पंजाब किंग्जकडून आयपीएल पदार्पण केले. मात्र, संघाने त्याला सोडून दिले. 2020 च्या लिलावात त्याला महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधार संघ चेन्नई सुपर किंग्सने 5.5 कोटींमध्ये विकत घेतले, तो दोन वर्षे या संघाचा भाग राहिला. त्याचवेळी दुखापतीमुळे तो गेल्या हंगामात खेळू शकला नव्हता. सॅमने 32 सामन्यात 337 धावा करण्यासोबतच आयपीएलमध्ये 32 विकेट्स घेतल्या आहेत. 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा तो सामनावीर देखील होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()