Rohit Sharma : आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबरला होणार आहे. मात्र त्यापूर्वीच रिटेंशन लिस्टमध्येच मोठा ड्रामा झाला. गुजरात टायटन्सचा कर्णधारच मुंबई इंडियन्सने गळाला लावला. आधी ही एक पुडी असल्याचं वाटत होतं. मात्र जसजसा दिवस संपू लागला या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं. आता तर निता अंबानी, आकाश अंबानी खुद्द हार्दिक पांड्या यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या. मात्र या सर्व वादळी ट्रेडमध्ये मुंबईला 5 वेळा विजेतेपद जिंकून देणारा रोहित कुठंच दिसला नाही.
2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विश्रांती घेतली आहे, जी त्याच्या शारीरिक आणि मानसिक तणावासाठी खूप आवश्यक होती. वर्ल्ड कपची अनेक महिन्यापासून तयारी सुरू होती. त्यावेळी रोहित शर्माच्या डोक्यात वर्ल्ड कपशिवाय दूसरा कोणाता विषय नव्हता. आणि तो सोशल मीडियापासून खुप लांब होता. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे.
टीम इंडियाने पहिल्या सामन्यापासून उपांत्य फेरीपर्यंत सर्व सामने जिंकले आणि त्यानंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, त्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनू शकली नाही आणि रोहितच्याही डोळ्यात अश्रू आले.
मात्र, आता एकदिवसीय वर्ल्ड कप संपला असून, रोहित शर्मा पत्नीसोबत सुट्टीवर गेला आहे. दरम्यान, रोहितने अनेक महिन्यांनंतर सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या पत्नीसोबत शांत आणि सुंदर ठिकाणी फिरताना दिसत आहे. स्टोरी तशी व्हेकेशनचीच आहे. मात्र सध्याच्या घडामोडीत या स्टोरीचा अर्थ काय काढायचा... रोहितचा ही स्टोरी ठेवण्यामागं उद्येश काय हेच स्पष्ट होत नाहीये.
हार्दिक पांड्या आला मुंबईत
आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी रिटेंशन आणि रिलीज लिस्ट सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी यापूर्वी जेवढा गोंधळ झाला नव्हता, तो 26 नोव्हेंबर 2023 ला झाला. यापूर्वी दोन दिवस आधीच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये जाणार अशी बातमी आली. गुजरातचा कर्णधार मुंबई इंडियन्समध्ये परत कशाला येईल असं वाटत होतं.
त्यातच रिटेंशन लिस्ट सादर करायला अवघे काही तास शिल्लक असतानाच हार्दिकला गुजरात टायटन्सने रिटेन केल्याचे वृत्त आलं अन् हार्दिकची घरवापसी फुसका बार निघाला अशी चर्चा सुरू झाली. मात्र वारं पुन्हा एकदा फिरलं अन् बीसीसीआयमधील खात्रीलायक सूत्रांकडून हार्दिकबाबत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये व्यवहार झाला असल्यांच सांगण्यात आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.