RCB vs MI IPL 2023 LIVE : तिलक वर्माच्या 84 धावांच्या खेळीमुळे मुंबईने आरसीबीविरूद्ध फाईट बॅक केले असे वाटत होते. मात्र विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिसने मुंबई फॅन्सच्या या आशेवर पाणी फेरले. मुंबईचे 172 धावांचे आव्हान आरसीबीने 16.2 षटकात 8 गडी राखून पार करत मोठा विजय मिळवला. ज्या पद्धतीने विराट आणि ड्युप्लेसिसने सुरूवात केली ते पाहते ते आरामात सामना जिंकू शकले असते. मात्र या दोघांनी दूरदृष्टी दाखवत सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून चांगल्या धावगतीचा पुढे क्वालिफायरसाठी फायदा होईल.
विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी आपला तडाखा 10 व्या षटकातनंतरही कायम ठेवला. दरम्यान, विराट कोहलीने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. फाफ ड्युप्लेसिसने देखील आपला गिअर बदलला होता. असे वाटले की हे दोघेच 15 व्या षटकापर्यंतच 172 धावा करतील.
मात्र 15 षटकात 148 धावांची सलामी देणारी ही जोडी अखेर अर्शद खानने फोडली. त्याने ड्युप्लेसिसला 73 धावांवर बाद केले. पाठोपाठ दिनेश कार्तिक देखील शुन्यावर ग्रीनला विकेट देऊन बसला. या पाठोलाठ पडलेल्या दोन विकेट्सनंतर विराट कोहलीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत 48 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. त्याला दोन षटकार मारत 3 चेंडूत 12 धावा करणाऱ्या मॅक्सवेलने विजयापर्यंत साथ दिली. या दोघांनी आरसीबीचा विजय 16.2 षटकातच साकारला.
मुंबई इंडियन्सने अखेरच्या काही षटकात झुंजार खेळी करत 171 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर सामना रंगतदार होईल असे वाटत होते. मात्र आरसीबीने आपल्या घरच्या चाहत्यांसमोर दमदार सुरूवात केली.
सलामीवीर विराट कोहली आणि कर्णधार फाफ ड्युप्लेसिस यांनी पहिल्या 9 षटकातच 80 धावा चोपल्या. ड्युप्लेसिसने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर आरसीबीने 10 षटकात शंभरी देखील गाठली.
मुंबईची वरची फळी स्वस्तात माघारी गेल्यानंतर मुंबईच्या 150 धावा तरी होतील का असा प्रश्न पडला होता. मात्र तिलक वर्माने 46 चेंडूत 84 धावा चोपून काढत मुंबईला 171 धावांपर्यंत पोहचवले.
रोहित बाद झाल्यानंतर सावध सुरूवात करणाऱ्या सूर्यकुमार यादवला आपली गाडी 15 धावांचा पुढे नेता आली नाही. तो 16 चेंडूत 15 धावा करून बाद झाला.
रोहित शर्माचा सिराज आणि कार्तिकने 1 धावेवर झेल सोडला. मात्र तरी देखील त्याला त्याचा फायदा उचलता आला नाही. तो आकाशदीपच्या गोलंदाजीवर 1 धावेवरच बाद झाला.
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनला मुंबईने 17.5 कोटी रूपये खर्चून संघात घेतले. मात्र पहिल्याच सामन्यात आरसीबीच्या रिसे टोप्लेने त्याचा 5 धावांवर त्रिफळा उडवला.
मोहम्मद सिराजने सामन्याच्या तिसऱ्या षटकात मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज इशान किशनला 10 धावांवर बाद केले.
रॉयल चॅलेंजर बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.