IPL 2024 Auction : आता आयपीएल स्टार पैशात लोळणार! 17 व्या हंगामाच्या लिलावाचे नियम बदलणार

IPL 2024 Auction
IPL 2024 Auctionesakal
Updated on

IPL 2024 Auction : आयपीएल लिलावात खेळाडू सर्वाधिक बोली लागण्याचे रेकॉर्ड दिवसेंदिवस मोडत आहेत. आता आयपीएल 2024 च्या लिलावात टी 20 स्टार्स खेळाडूंचा खिसा अजून गरम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय आयपीएल 2024 चा लिलाव डिसेंबरच्या शेवटी आयोजित करण्यासाठी उत्सुक आहे.

बीसीसीआय ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि आयपीएल लिलाव एकाचवेळी येऊ नयेत याची काळजी घेणार आहे. आयपीएल फ्रेंचायजींच्या पर्सबाबत बोलायचं झालं तर यंदाच्या लिलावात फ्रेंचायजींची पर्स ही 100 कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

IPL 2024 Auction
Fitness Influencer : 210 किलो वजन मानेवर पडल्याने 33 वर्षाच्या फिटनेस ट्रेनरचा दुर्दैवी मृत्यू

बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला सांगितले की, 'सध्या तरी सर्व लक्ष हे वर्ल्डकप आणि त्या संदर्भातील सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण आयपीएलकडे वळू शकतो. आम्ही आयपीएल लिलावाची तारीख वर्ल्डकपनंतर निश्चित करू.'

'साधारणपणे हा लिलाव डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होईल. मात्र हे आयपीएलच्या सर्वाधारण बैठकीत चर्चा करूनच निश्चित होईल. ख्रिसमसच्या दरम्यान लिलाव होणार नाही हे नक्की आहे. आम्ही सर्वांना सोयीची तारीख ठरवली जाईल.'

यंदाचा आयपीएल लिलाव हा मिनी लिलाव असणार आहे. त्यामुळे रिटेंशनवर कोणतेही कॅप असणार नाही. याचबरोबर 2024 च्या लिलावात फ्रेंचायजींच्या पर्समध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. आता फ्रेंचायजी 95 ऐवजी 100 कोटी रूपये खर्च करू शकणार आहेत. यामुळे खेळाडूंचा खिसा चांगलाच गरम होणार आहे.

IPL 2024 Auction
Asian Games Trials : दिल्ली उच्च न्यायालयाचा विनेश, बजरंगला दिलासा; याचिका फेटाळली

आयपीएल लिवातील तीनवेळा रेकॉर्ड ब्रेक झाले आहे. सॅम करन, कॅमरून ग्रीन, बेन स्टोक्स आणि निकोलस पूरन यांना 15 कोटींच्या पुढची बोली लागली आहे. हॅरी ब्रुकला सनराईजर्स हैदराबादने 13 कोटींची बोली लावून आपल्या गोटात घेतले होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.