IPL 2024 CSK Retain Release Players : चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्ससह सोडले इतके खेळाडू, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

IPL 2024 CSK Retain Release Players : चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्ससह सोडले इतके खेळाडू, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
Updated on

IPL 2024 CSK Retain Release Players List : प्रतीक्षा संपली आहे... आणि चेन्नई सुपर किंग्जने आगामी आयपीएल हंगामासाठी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या संघाने 8 खेळाडूंना सोडले केले आहे. यासह चेन्नई सुपर किंग्जच्या पर्सची किंमत 32.1 कोटी रुपये झाली आहे. चेन्नईच्या सर्व राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंच्या नावे जाणून घेऊया...

IPL 2024 CSK Retain Release Players : चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्ससह सोडले इतके खेळाडू, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
IPL 2024 : आता होणार महायुद्ध! जाणून घ्या 10 संघांनी कोणत्या खेळाडूंना केले रिलीज अन् कोणाच्या पर्समध्ये किती पैसे?

चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टोक्सला आयपीएल 2023 मध्ये 16 कोटी रुपयांची मोठी किंमत देऊन करारबद्ध केले होते. पण, फ्रँचायझी त्याला सोडण्याआधीच, स्टोक्सने आधीच स्वतःला आगामी आयपीएल हंगामासाठी अनुपलब्ध घोषित केले. परिणामी, तो आता आयपीएल 2024 मध्ये CSK चा भाग असणार नाही.

चेन्नई सुपर किंग्जचे सोडलेले खेळाडू : बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, अंबाती रायडू, सिसांडा मगाला, काइल जेमिसन, भगत वर्मा, सेनापती आणि आकाश सिंग.

चेन्नई सुपर किंग्जच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगेरगेकर, रवींद्र जडेजा, अजय चंदल, अजय चक्कल , मथिशा पाथीराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद. मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, बेन स्टोक्स.

चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2008 पासून केले आहे. आणि त्याने फ्रेंचायझीसाठी 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण, आता अशा बातम्या येत आहेत की महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2024 मध्ये नवीन कर्णधाराची जबाबदारी सोपवू शकतो. मात्र, फ्रँचायझीकडून कर्णधारपदाबाबत अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही.

आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. या स्पर्धेचा लिलाव भारताऐवजी परदेशात होण्याची ही पहिलीच वेळ असेल. आता चेन्नई सुपर किंग्ज 32.1 कोटी रुपयांच्या पर्स मूल्यासह या लिलावात पोहोचणार आहे. जिथे ती आपला संघ आणखी मजबूत करण्यासाठी मोठ्या खेळाडूंवर सट्टा खेळताना दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.