IPL Hardik Pandya : हार्दिककडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय संघहिताचा; सुनील गावसकर

सुनील गावसकरांचे मुंबई इंडियन्समधील बदलाबाबत मत
ipl 2024 mumbai indians lead hardik pandya sunil gavaskar cricket sport marathi news
ipl 2024 mumbai indians lead hardik pandya sunil gavaskar cricket sport marathi newsesakal
Updated on

मुंबई : मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकून हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. या निर्णयानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते निराश झाले. टीकाही करण्यात आली;

मात्र भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी हा निर्णय चुकीचा की बरोबर असे बघू नये, रोहित शर्माला भारतासह मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्वही सांभाळावे लागते. सातत्याने क्रिकेट खेळून तो थकला आहे. त्यामुळे कर्णधार बदलण्यात आला आहे. हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये नवा विचार घेऊन येईल. हा निर्णय संघहिताचा आहे.

सुनील गावसकर पुढे म्हणतात, मुंबई इंडियन्सने २०२० मध्ये आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले. त्यानंतर या संघाला अजिंक्यपदावर नाव कोरता आले नाही. मुंबई इंडियन्सला २०२१ व २०२२ मध्ये प्ले ऑफमध्येही पोहोचता आले नाही.

या वर्षी त्यांचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला, पण या संघात पूर्वीसारखा जोश दिसून आला नाही. रोहित शर्माच्या फलंदाजीतही व्यस्त वेळापत्रकामुळे फरक पडू लागला आहे. त्याच्या बॅटमधून धावाच निघाल्या नाहीत. याचा फटकाही संघाला बसतो आहे.

गुजरातसाठी मोलाची कामगिरी

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने २०२२ मध्ये पहिल्याच प्रयत्नात आयपीएल जिंकण्याची किमया करून दाखवली. या वर्षी उपविजेता होण्याचा मान संपादन केला. मुंबई इंडियन्सने याकडे गांभीर्याने लक्ष दिले. नव्या खेळाडूकडे कर्णधारपद सोपवल्यास तो संघामध्ये नवी ऊर्जा आणेल. त्यामुळे याचा संघाला फायदाच होईल. तोटा होणार नाही, असे सुनील गावसकर यांना वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.