IPL 2025 Auction BCCI Retain rule : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या हालचालींना वेग पकडत चालला आहे. ३१ जुलैला यासाठी फ्रँचायझी मालक आणि बीसीसीआयचे पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत फ्रँचायझींनी रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढवावी, मेगा ऑक्शन दर ४ वर्षांनी घ्यावं, RTM आदी काही मुद्यांवर ठाम मत मांडलं. अनेक फ्रँचायाझींनी मेगा ऑक्शनला कडाडून विरोध केल्यानंतर आता काही महत्त्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत.
गुजरात टायटन्स आयपीएलच्या आगामी पर्वासाठी आशिष नेहरा याला मुख्य प्रशिक्षकपदी कायम राखण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आयपीएल २०२५ पूर्वी CVC capital या फ्रँचायझीचे मालकी हक्क असलेल्या कंपनीने नवीन मुख्य प्रशिक्षक निवडल्यास आश्चर्य वाटायला नको. GTच्या सपोर्ट स्टाफमध्ये विक्रम सोलंकी हा महासंचालक आहे, आशिष नेहरा मुख्य प्रशिक्षक आणि गॅरी कर्स्टन मेंटॉर आहे. यात बदल होण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसू शकतो. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड अर्थात ECB त्यांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंड संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कुमार संगकारार याला विचारले गेले आहे. कुमार हा सध्या राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक आहे, परंतु त्याने ECB ची ऑफर स्वीकारल्यास ही जागा रिक्त होईल. त्यामुळे राहुल द्रविडचे RR च्या ताफ्यात येण्याचा मार्ग मोकळा होईल. यापूर्वीही द्रविडने या फ्रँचायझीच्या मुख्य प्रशिक्षकपदाची पार पाडली होती.
BCCI आणि फ्रँचायझी मालकांमध्ये झालेल्या बैठकीत अनेकांनी मेग ऑक्शनला विरोध दर्शवला होता. पण, मेगा ऑक्शन करण्यावर BCCI ठाम दिसतेय. त्यावर तोडगा म्हणून बीसीसीआय प्रत्येक फ्रँचायझीला ६ खेळाडूंना संघात कायम राखण्याची संधी देऊ शकते. यामध्ये RTM म्हणजेच राईट टू मॅच हाही पर्याय असेल. यापूर्वी २०२२ मध्ये बीसीसीआयने फक्त ४ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिली होती आणि RTM नव्हते.
BCCI ने सहा खेळाडूंना रिटेन ठेवण्याचा नियम आणल्यास मुंबई इंडियन्स त्याचा फायदा नक्की उचलेल. हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने रोहित शर्मा नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि तो IPL 2025 पूर्वी फ्रँयाचझी सोडेल अशी चर्चा आहे. पण, MI रोहित, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा व टीम डेव्हिड असे सहा खेळाडू रिटेन ठेवतील. त्यामुळे रोहित व सूर्या कुठे जाणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण, MI सोबत राहायचं की नाही हा निर्णय रोहितच्याच हाती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.