IPL 2025 Mega Auction: लिलाव संपला! १८२ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी खर्च केले ६३९.१५ कोटी रुपये; पाहा खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी

IPL Auction 2025 Live Updates in Marathi: आयपीएलचा बहुचर्चित मेगा लिलाव सोमवारी संपला. यंदा लिलावात अनेक स्टार खेळाडूंनी नावं नोंदवली होती. यातील काही खेळाडूंना विक्रमी बोली लागली. तर काही स्टार खेळाडू अनसोल्ड राहिले. पाहा कोणते खेळाडू कोणत्या संघांनी घेतले.
IPL Auction Updates
IPL AuctionSakal
Updated on

IPL 2025 Auction all Teams:  इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा बहुचर्चित लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान जेद्दाहमध्ये पार पडला. या लिलावातून सर्वच फ्रँचायझींनी आपली संघबांधणी पूर्ण केली आहे. या लिलावातून आगामी १८ व्या हंगामासाठी सर्व फ्रँचायझींनी आपल्या संघ सज्ज केला आहे.

या लिलावात अनेक विक्रमी बोलीही लागल्या ऋषभ पंतला २७ कोटींची, तर श्रेयस अय्यरला २६.७५ कोटींची बोली लागली. याशिवाय देखील अनेक खेळाडूंना मोठ्या रकमेची बोली लागली. याशिवाय डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, केन विलियन्सन, जेम्स अँडरसन यांसारखे काही स्टार खेळाडू अनसोल्ड राहिले.

अवघ्या १३ वर्षांच्या वैभव सुर्यवंशी यालाही १.१० कोटींची बोली लागल्याचेही पाहायला मिळाले. एकूणच हा लिलाव विक्रमी ठरला असून सर्व फ्रँचायझींनी पुढील ३ वर्षाच्या दृष्टीनेही एक प्रकारे संघ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.