IPL Auction 2022 | कोटींच्या उलाढालींचा आज आयपीएल लिलाव

५९० क्रिकेटपटू, ५६१ कोटी, दहा संघांमध्ये चुरस
IPL Auction 2022
IPL Auction 2022sakal
Updated on

मुंबई : आयपीएलचा महालिलाव बंगळूरमध्ये शनिवारी (१२ फेब्रुवारी) व रविवारी (१३ फेब्रुवारी) रंगणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सहभागी होत असलेल्या १० संघांच्या मालकांमध्ये मनाजोगते क्रिकेटपटू आपल्या संघात घेण्यासाठी यावेळी रस्सीखेच लागेल. तब्बल ५९० क्रिकेटपटू रिंगणात उतरले असून दहा संघ मालकांकडे एकूण ५६१.५० कोटी रुपये शिल्लक आहेत.

आयपीएलच्या लिलावामध्ये ३७० भारतीय व २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. एकूण ४८ क्रिकेटपटूंची मूलभूत किंमत दोन कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यामध्ये ३१ परदेशी, तर १७ भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. दीड कोटी मूलभूत किंमत असणारे २० क्रिकेटपटू आहेत. तसेच एक कोटी मूलभूत किंमत असणारे ३४ क्रिकेटपटू आहेत.

संघातील परदेशी खेळाडूंची संख्या

अफगाणिस्तान - १७, ऑस्ट्रेलिया - ४७, बांगलादेश - ५, इंग्लंड - २४, आयर्लंड - ५, न्यूझीलंड - २४, दक्षिण आफ्रिका - ३३, श्रीलंका - २३, वेस्ट इंडीज - ३४, झिम्बाब्वे - १, नामिबिया - ३, नेपाळ - १, स्कॉटलंड - २, अमेरिका - १.

या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता

श्रेयस अय्यर, महम्मद शमी, रवीचंद्रन अश्‍विन व शिखर धवन या भारतीय खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे. तसेच डेव्हीड वॉर्नर, पॅट कमिन्स, क्विंटन डीकॉक, कगिसो रबाडा व ट्रेंट बोल्ट या परदेशी क्रिकेटपटूंनाही आपापल्या संघात खेचून घेण्यासाठी संघ मालकांमध्ये चुरस लागलेली दिसेल.

काय होणार या माजी दिग्गजांचे?

सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, भुवनेश्‍वरकुमार, अमित मिश्रा, पीयूष चावला, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, इशांत शर्मा.

संघांमध्ये शिल्लक असलेल्या जागा

  • चेन्नई सुपरकिंग्स ः २१ (परदेशी खेळाडूंसाठी ७)

  • दिल्ली कॅपिटल्स ः २१ (परदेशी खेळाडूंसाठी ७)

  • कोलकता नाईट रायडर्स ः २१ (परदेशी खेळाडूंसाठी ६)

  • लखनौ सुपरजायंटस्‌ ः २२ (परदेशी खेळाडूंसाठी ७)

  • मुंबई इंडियन्स ः २१ (परदेशी खेळाडूंसाठी ७)

  • पंजाब किंग्स ः २३ (परदेशी खेळाडूंसाठी ८)

  • राजस्थान रॉयल्स ः २२ (परदेशी खेळाडूंसाठी ७)

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ः २२ (परदेशी खेळाडूंसाठी ७)

  • सनरायझर्स हैदराबाद ः २२ (परदेशी खेळाडूंसाठी ७)

  • गुजरात टायटन्स ः २२ (परदेशी खेळाडूंसाठी ८)

दहा संघांची शिल्लक असलेली रक्कम

  • चेन्नई सुपरकिंग्स : ४८ कोटी

  • दिल्ली कॅपिटल्स : ४७.५० कोटी

  • कोलकता नाईट रायडर्स : ४८ कोटी

  • मुंबई इंडियन्स : ४८ कोटी

  • पंजाब किंग्स : ७२ कोटी

  • राजस्थान रॉयल्स : ६२ कोटी

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : ५७ कोटी

  • सनरायझर्स हैदराबाद : ६८ कोटी

  • गुजरात टायटन्स : ५२ कोटी

  • लखनौ सुपरजायंटस्‌ : ५९ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com