Sourav Ganguly: आयपीएल ही जगातील सर्वात जास्त पाहिली जाणारी लोकप्रिय लीग आहे. अनेक क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. लवकरच आयपीएल 2023 ते 2027 च्या मीडिया हक्कांची घोषणा केली जाईल आणि त्यानंतर ही लीग जगातील दुसरी सर्वात मोठी स्पोर्ट्स लीग बनेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आनंदी झाला आहे. (IPL Generates More Revenue Than English Premier League)
एका इव्हेंटमध्ये बोलताना सौरव गांगुली म्हणाला, मी हा खेळ लहानपणापासून पाहत आलो आहे. जिथे माझ्यासारख्या अनेक खेळाडूंनी हजारांची कमाई केली आहे आणि आता त्यांच्यात कोटी कमावण्याची क्षमता आहे. हा खेळ चाहत्यांकडून, या देशातील लोकांद्वारे आणि क्रिकेट चाहत्यांनी तयार केलेल्या बीसीसीआयने चालवला आहे. इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा आयपीएल अधिक कमाई करते. मला आवडणारा खेळ इतका मोठा झाला आहे याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो.
आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन संघांच्या आगमनाने लीग खूप मोठी झाली. आता सामन्यांची संख्या देखील 74 झाली आहे. इतकेच नाही तर एका हंगामासाठी 94 सामने आयोजित करण्याची बीसीसीआयची योजना आहे. पुढील पाच वर्षांसाठी प्रसारमाध्यमांचे हक्क विकण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे बीसीसीआयला मोठी कमाई होणार आहे. जरी आयपीएलचे सर्व हक्क मूळ किमतीत विकले गेले तरी बीसीसीआयला एका सामन्यासाठी सुमारे 94 कोटी रुपये मिळू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.