आनंदाची बातमी, आयपीएल संदर्भात BCCI चा मोठा निर्णय

ipl
iplgoogel
Updated on

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर(Corona 2nd wave)स्थगित झालेली यंदाची बहूचर्चित आयपीएल स्पर्धा पुन्हा दुबईमध्ये होणार आहे. सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची आभासी विशेष सर्वसाधारण सभा (SGM) शनिवारी मुंबईत पार पडली. यामध्ये आयपीएल-14 च्या उर्वरित सामन्याचा निर्णय घेण्यात आला. युएई, अबूधाबी, दुबई आणि शारजाह येथे तीन ठिकाणी आयपीएल-14 चे उर्वरित सामने सप्टेबर-ऑक्टोबरदरम्यान खेळवले जाणार आहेत. (IPL has been moved to UAE for this season Vice-President BCCI Rajeev Shukla to ANI)

तसेच, आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यासाठी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत बीसीसीआय विदेशी क्रिकेट बोर्डासोबत चर्चा करणार आहे. ऑस्ट्रलियाचे खेळाडू उपलब्ध आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या खेळाडूंच्या उपलब्धतेबाबात शंका आहे. मात्र, आम्ही संबधित क्रिकेट बोर्डासोबत याबाबत चर्चा करणार असल्याचं बीसीसीआयनं सांगितल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

ipl
WTC Final : तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

कोरोना महामारी संकाटाच्या काळात भारतात टी -२० विश्वचषक होऊ शकतो की नाही? याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेणं, थोडं लवकर आणि घाईचं होऊ शकतं. आणखी वेळ मिळण्यासंदर्भात बीसीसीआय एक जून रोजी होणाऱ्या बैठकीत आयसीसीकडे मागणी करणार आहे.

आयपीएल सामन्यादरम्याव चार मे रोजी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जाणार आहेत. आयपीएलचे 31 सामने खेळवायचे राहिले आहेत. तीन आठवड्यांच्या कालावधीत 10 डबल हेडर खेळवले जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()