मुंबई : आयपीएल प्रसारण हक्कची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेद्वारे बीसीसीआयच्या तिजोरीत तब्बल 48,390 कोटी रूपयांचा महसूल जमा होणार आहे. यातील काही वाटा आयपीएलच्या फ्रेंचायजींना देखील देण्यात येणार आहे. दरम्यान, आयपीएल जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत लीग ठरल्यानंतर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. मुंबई इंडियन्सच्या मालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Reliance Industries Ltd) संचालक नीता अंबानी यांनी देखील प्रतिक्रिया दिली. (IPL Media Rights Auction Mumbai Indians Nita Ambani Reaction)
नीता अंबानी यांनी सोशल मीडियावर 'क्रीडा क्षेत्र नेहमीच मनोरंजन करण्याबरोबर प्रेरणा देण्याचे काम करते. खेळामुळेच आपण सर्वजण एकत्र येतो. क्रिकेट आणि आयपीएल भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असून, ते जगात भारताचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळेच आम्हाला आयपीएल आणि क्रिकेटसोबत जोडलं गेल्याचा अभिमान वाटतोय. त्यामुळेच आयपीएल लीगला जगभरात प्रत्येक क्रीडाप्रेमीपर्यंत पोहचण्याचं आमचं मिशन आहे.' अशी प्रतिक्रिया दिली.
विशेष म्हणजे यंदाच्या प्रक्षेपण हक्क लिलाव प्रक्रियेत रिलायन्सची गुंतवणूक असणाऱ्या व्हायकॉम 18 या ग्रुपने चार पॅकेजपैकी तीन पॅकेज आपल्या नावावर करण्यात यश मिळवले. त्यांनी डिजीटल राईट्स, स्पेशल सामन्यांचे पॅकेज आणि भारतीय उपखंड सोडून इतर ठिकाणी आयपीएल प्रसारणाचे हक्क टाईम्स इंटरनेटच्या साथीने मिळवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.