IPLच्या मीडिया राईट्ससाठी अंबानी सरसावले, ट्रॉफीवर दिसणार रिलायन्सच नाव?

जेफ बेझोसच्या अ‍ॅमेझॉनने मैदान सोडले; मुकेश अंबानींची रिलायन्सच शर्यतीत
Mukesh Ambani vs Jeff Bezos For IPL TV Rights
Mukesh Ambani vs Jeff Bezos For IPL TV Rights
Updated on

IPL Media Rights: आयपीएल ही जगातील सर्वात जास्त पाहिली जाणारी लोक प्रिय लीग आहे. अनेक क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. अमेरिकेतील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आयपीएल सामन्यांचे स्ट्रीमिंग हक्क मिळविण्यासाठी स्पर्धेतून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. या शर्यतीत मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने सामील आहेत. (Mukesh Ambani vs Jeff Bezos For IPL TV Rights)

Reliance Industries Limited चे Viacom18 हे टीव्ही आणि डिजिटल दोन्ही हक्कांसाठी प्रबळ दावेदार मानले जाते. डिजिटल अधिकारांसाठी सर्वात मोठ्या बोलीसाठी अ‍ॅमेझॉन आघाडीवर असेल अशी बेझोसची अपेक्षा होती, परंतु कारण न देता शर्यतीतून माघार घेतली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या माहिती नुसार, अ‍ॅमेझॉन शर्यतीतून बाहेर आहे. आतापर्यंत 10 कंपन्या (टीव्ही आणि स्ट्रीमिंग) शर्यतीत आहेत. मीडिया हक्कांसाठी यावेळी चार विशेष पॅकेजेस तयार केले आहेत. ज्यामध्ये 2023 ते 2027 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक हंगामातील 74 सामन्यांचा दोन दिवसांत ई-लिलाव केला जाईल. शेवटची दोन वर्षे ज्यामध्ये सामन्यांची संख्या 94 पर्यंत वाढवली जाईल.

पॅकेज A मध्ये भारतीय उपखंडातील विशेष टीव्ही प्रसारण अधिकार आहेत तर पॅकेज B मध्ये भारतीय उपखंडासाठी डिजिटल अधिकार समाविष्ट आहेत. पॅकेज C प्रत्येक हंगामातील 18 निवडक सामन्यांसाठी डिजिटल अधिकारांसाठी आहे तर पॅकेज D मध्ये सर्व सामने टीव्हीसाठी आणि परदेशी बाजारपेठेसाठी डिजिटलसाठी एकत्रित अधिकारांसाठी असेल. गेल्या वेळी स्टार इंडियाने 16,347.50 कोटी रुपयांच्या एकत्रित बोलीमध्ये टीव्ही आणि डिजिटल दोन्ही हक्क विकत घेतले होते, परंतु यावेळी एकूण मूळ किंमत 32,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.