IPL चा मेगा ऑक्शन लवकरच; 2 टीमसह 50 खेळाडूंना मिळणार संधी

10 संघ आयपीएलच्या रणसंग्रामात उतरल्याचे पाहायला मिळणार
ipl
iplFile Photo
Updated on

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामात दोन नवे संघ मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. पुढच्या महिन्यात नव्या दोन संघासाठी बीसीसीआयकडून निविदा काढण्यात येऊ शकते. आयपीएल स्पर्धेत आणखी दोन संघ समावेश झाल्यामुळे बीसीसीआयला मोठा आर्थिक फायदा निश्चितच होईल. आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत 8 संघ सहभागी होताना आपण पाहिले आहे. यात आता वाढ होणार असून 10 संघ आयपीएलच्या रणसंग्रामात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. (IPL Mega Auction May Be December For Indian Premier League 50 more Playes Play 2 New Team)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ऑगस्टमध्ये बीसीसीआय दोन नव्या संघासाठी निविदा काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंतच आयपीएलला आणखी दोन नवे संघ मिळतील, अशी अपेक्षा आहे. सध्याच्या घडीला गोयंका आणि अदानी ग्रुप आयपीएलचे नवे संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. सरशेवटी यात बाजी कोण मारणार यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल. दोन नवे संघ सामील झाल्यानंतर आयपीएल स्पर्धेतील सामनेही वाढतील. त्यामुळे त्यासाठीच्या प्रसारण अधिकारासाठी बीसीसीआयकडून पुढील वर्षी जानेवारीमध्ये निवेदा काढण्यात येऊ शकते.

ipl
"IPL मुळे T-20 Word Cup मध्ये फिरकीपटूंचा बोलबाला दिसेल"

डिसेंबरमध्ये बीसीसीआयकडून आयपीएलच्या मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात येऊ शकते, अशीही चर्चा रंगताना दिसते. मेगा ऑक्शनमध्ये पुन्हा खेळाडूंवर मोठी बोली लागेल. लिलावापूर्वी सध्याच्या घडीला स्पर्धेत सहभागी असलेले संघ प्रत्येकी चार-चार खेळाडूंना रिटेन करु शकतात. यात 3 भारतीय तर 1 परदेशी खेळाडूचा समावेश असावा, या अटीची पूर्तता करणे अनिवार्य असणार आहे. देशातील 2 आणि परदेशातील 2 खेळाडू रिटने करण्याचा पर्यायही संघांसाठी खुला असेल. त्यामुळे मेगा ऑक्शननंतर दोन नव्या संघासह अन्य संघात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळू शकते. प्रत्येक फ्रेंचायझी आपल्या संघाची मजबूत बांधणी करण्यासाठी नियोजन आखताना दिसतील. कदाचित याची सुरुवातही झाली असेल.

ipl
स्मृती मानधनाचा ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

मेगा ऑक्शनमध्ये अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. फ्रेंचायझीच्या सॅलरी 85 कोटींवरुन 90 कोटी इतकी करण्यात येईल. नियमानुसार, प्रत्येक फ्रेंचायझी संघात 25 खेळाडू असतात. दोन नवे संघ सहभागी होणार असल्यामुळे आणखी 50 खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. नव्या संघात देशातील 34 तर परदेशातील 15 खेळाडूंना संधी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.