IPL Player Earnings: IPL मध्ये कोण किती कमावतं? जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएलमधील खेळाडूंचे नेटवर्थ समोर आले आहे.
IPL networt virat kohli ms dhoni rohit sharma suresh raina
IPL networt virat kohli ms dhoni rohit sharma suresh raina
Updated on

IPL Player Earnings: आयपीएल 2023 सुरू होण्यास आता काही दिवसच राहिले आहेत. येत्या 31 मार्च रोजी आयपीएलचा बिगुल वाजणार आहे. यंदाच्या मोसमातील पहिला सामना गुजरात जाएंटस विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान होणार आहे.

दरम्यान, आयपीएलमधील खेळाडूंचे नेटवर्थ समोर आले आहे. कोण किती कमावतं याची माहिती मिळाली आहे. (IPL networt virat kohli ms dhoni rohit sharma suresh raina)

IPL networt virat kohli ms dhoni rohit sharma suresh raina
IPL 2023 : ‘इम्पॅक्ट खेळाडू’ असला तरी अष्टपैलूचे महत्त्व कमी नाही ; रोहित शर्मा

2008 मध्ये सुरू झालेल्या आयपीएलने अनेक खेळाडूंना श्रीमंत केले आहे. केवळ पगारातून 150 कोटींहून अधिक कमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 3 नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही तीनही खेळाडू भारताचे आहेत. (Latest Marathi News)

रोहित शर्मा

आयपीएलमध्ये कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहितने आयपीएलमधून आतापर्यंत सुमारे १७८ कोटी रुपये कमावले आहेत.

2008 मध्ये 3 कोटींना विकल्या गेलेल्या रोहित शर्माचा सध्याचा पगार 16 कोटी आहे. कमाईच्या बाबतीत त्याने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनाही मागे टाकले आहे.

महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी हा आयपीएल सीझन 2008 मधील सर्वात महागडा खेळाडू होता. यावेळी धोनीचा पगार 6 कोटी रुपये होता, जो सध्या 12 कोटी रुपये आहे. (Latest Sport News)

धोनीचा 2018 ते 2021 पर्यंतचा पगार 15 कोटी रुपये होता. आयपीएलमधून कमाईच्या बाबतीत धोनी दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने आतापर्यंत सुमारे १७६ कोटी रुपये कमावले आहेत.

विराट कोहली

क्रिकेट जगतातील महान खेळाडूंपैकी एक विराट कोहली आयपीएलमधून कमाईच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला आतापर्यंत 173 कोटी रुपये आयपीएलमधून पगार म्हणून मिळाले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 5 शतके आणि 44 अर्धशतकांसह एकूण 6624 धावा केल्या आहेत.

IPL networt virat kohli ms dhoni rohit sharma suresh raina
IPL 2023: नवा कर्णधार... नवा कोच... बदलणार का पंजाब किंग्जचे नशीब

सुरेश रैना

सुरेश रैना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याने 1 शतक आणि 39 अर्धशतके झळकावली आहेत. रैनाने पहिल्या 12 आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी करत प्रत्येक वर्षी तीनशेहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 110 कोटी रुपये पगाराची कमाई केली आहे.

रवींद्र जडेजा

आयपीएलमधील कमाईच्या बाबतीत रवींद्र जडेजाही मालामाल आहे. पहिल्या सीझनमध्ये 12 लाख रुपयांना विकला गेलेला रवींद्र जडेजा सध्या 16 कोटी रुपये मानधनावर आहे आणि तो या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे. जडेजाने आयपीएलमधून आतापर्यंत 109 कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.