IPL vs PSL Media Rights: शेजारी राष्ट्र पाकिस्तान कायम भारताची तुलना करत असते. अशीच तुलना पाकिस्तानच्या पाकिस्तान सुपर लीग आणि भारताच्या इंडियन प्रीमियर लीगची केली जात होती. अर्थात ही तुलना पाकिस्तानकडूनच कायम होते. मात्र अशी तुलना करणे हा फक्त एक कल्पनाविलास असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल मीडिया राईट्स लिलावावेळी सिद्ध झाले.
आयपीएलच्या 2023 ते 2027 अशा पाच वर्षासाठी बीसीसीआयने मीडिया राईट्स लिलाव प्रक्रिया राबवली. या लिलाव प्रक्रियेद्वारे बीसीसीआय एका आयपीएल सामन्यातून जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त रक्कमेची कमाई करणार आहे. याची तुलना जर पीएसएलच्या कमाईशी केली तर संपूर्ण हंगामाची कमाई देखील 100 कोटींच्या वर जात नाही.
बीसीसीआयने आयपीएलच्या 2023 ते 2027 साठी मीडिया राईट्स विकण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी या लिलाव प्रक्रियेसाठी चार विभाग केले. या चार विभागापैकी आतापर्यंत फक्त दोन विभागाचीच लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आयपीएलची भारतीय उपखंडात टीव्ही आणि डिजीटल राईट्सचीच लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून या दोन लिलावातून बीसीसीआयला एका आयपीएल सामन्यापाठीमागे 100 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गेल्या वर्षी पीएसएलच्या 2022 आणि 2023 च्या मीडिया राईट्सचा लिलाव केला होता. पीसीबीने दोन्ही हंगामाचे मीडिया राईट्स भारतीय रूपयांमध्ये 1 अब्ज 66 कोटी रूपयांना विकले. पीएसएलच्या एका हंगामाची किंमत जवळपास 83 कोटी रूपये इतकी होते. यात फक्त पाकिस्तानातच नाही तर जगभरात प्रक्षेपण करण्याचे अधिकार मिळतात.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये एका हंगामात सरासरी 34 सामने होतात. यावरून जर पीएसएलच्या एका सामन्याचे मीडिया राईट्सची रक्कम काढली तर ती 2.5 कोटी पेक्षा कमी होते. दुसरीकडे आयपीएलच्या एका सामन्याच्या डिजीटल हक्काचा विचार केला तर त्यातून बीसीसीआय 50 कोटी कमावते. तेच एका सामन्याच्या टीव्ही राईट्समधून 57.5 कोटी रूपये बीसीसीआयच्या तिजोरीत येतात. यामुळे पाकिस्तानची पीएसएल आणि भारतीची आयपीएल यांची तुलना कोठेच होऊ शकत नाही हे सिद्ध होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.