'Tata IPL' मुळे बीसीसीआयला मिळणार ११२४ कोटी

Tata IPL Title Sponsor
Tata IPL Title Sponsoresakal
Updated on

नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध उद्योगसमूह टाटा ग्रुप (Tata Group) आयपीएलचे नवे मुख्य प्रायोजक असणार आहेत. अगोदरचे प्रायोजक व्हिवोने (Vivo) माघार घेण्याचा निर्णय घेतला. आयपीएल (IPL) प्रशासकीय समितीच्या बैठकीत टाटा ग्रुपला पुढील दोन वर्षांसाठी नवे प्रायोजक करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Tata IPL Title Sponsor)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा दोन वर्षांसाठी सुमारे ६७० कोटी मोजणार आहे; तर करार मध्येच संपवल्यामुळे व्हिवो बीसीसीआयला ४५४ कोटी देणार आहे. बीसीसीआयसाठी ही एकदमच फायद्याची घडामोड आहे. एकूणच २०२२ आणि २०२३ या मोसमासाठी बीसीसीआयला प्रायोजक रकमेतून ११२४ कोटींचा फायदा होणार आहे. (२०२२ मध्ये ५४७ कोटी; तर २०२३ मध्ये ५७७ कोटी) परंतु मध्येच करार संपवल्यामुळे व्हिवो दोन वर्षांसाठी मिळून १८३ कोटींचा फरक बीसीसीआयला देणे अपरिहार्य आहे.

व्हिवोचा करार होता २,२०० कोटींचा (Vivo IPL Title Sponsor Contract)

व्हिवोचा आयपीएलबरोबरचा करार २०१८ ते २०२२ या वर्षांसाठी २,२०० कोटी रुपयांचा होता. परंतु २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. त्यामुळे २०२० च्या आयपीएलमध्ये व्हिवो प्रायोजक नव्हते. २०२१ मध्ये ते पुन्हा प्रायोजक झाले होते. उपलब्ध माहितीनुसार २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांसाठी व्हिवो ९९६ कोटी (४८४ कोटी २०२२ आणि ५१२ कोटी २०२३) द्यायचे होते.

Tata IPL Title Sponsor
चूक झाली! अखेर जोकोविचने कबूल केले

Vivo जाण्याने, Tata येण्याने BCCI ला कसे मिळणार ११२४ कोटी?

  • आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपसाठी टाटा समूह दोन वर्षांसाठी ६७० कोटी देणार.

  • आयपीएलचे दोन संघ वाढल्याने व्हिवोला दोन वर्षांसाठी ९९६ कोटी द्यावे लागले असते.

  • व्हिवोने करार मध्येच संपवल्यामुळे त्यांना ३९४ कोटी (१८३ कोटी २०२२ आणि २११ कोटी २०२३) द्यावे लागणार.

  • व्हिवोला याव्यतिरिक्त सहा टक्के असाईन्मेंट फी ५० कोटी (२९ कोटी २०२२ आणि ३१ कोटी २०२३) द्यावी लागणार.

  • त्यामुळे व्हिवो बीसीसीआयला एकूण ३९४ + ६० कोटी असे ४५४ कोटी देणार.

  • टाटा समूहाकडून ६७० आणि व्हिवोकडून ४५४ असे बीसीसीआयला एकूण ११२४ कोटी दोन वर्षांसाठी मिळणार.

Tata IPL Title Sponsor
'स्लेज मास्टर' ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने मारली पलटी

अशी मिळणार रक्कम

टाटा समूहाने आयपीएलशी दोन वर्षांसाठी केलेल्या कराराची विभागणी ३३५ कोटी वर्षाला अशी आहे. यामध्ये ३०१ कोटी प्रायोजक हक्क आणि ३४ कोटी १४ सामने वाढल्याचे द्यावे लागणार आहेत. असे मिळून टाटा वर्षाला ६७० कोटी देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.