MS Dhoni RCB vs CSK : 110 मीटर सिक्स अन् उदास चेहरा... हीच काय ती धोनीची शेवटची आठवण? 

MS Dhoni
MS Dhoni RCB vs CSKesakal
Updated on

MS Dhoni RCB vs CSK Retirement : ज्यावेळी रॉयल चॅलेंजर बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला त्यानंतर चेन्नईचा थला महेंद्रसिंह धोनीच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही सांगून जात होते. आयपीएलमधील धोनीचं भविष्य काय असेल याचा अंदाज चाहते लावत आहेत. अटीतटीच्या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा 27 धावांनी पराभव केला. तसं पाहायला गेलं तर चेन्नईचे प्ले ऑफचे तिकीट अवघ्या 11 धावांनी हुकले. यानंतर धोनी युगाचा अंत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

MS Dhoni
MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 35 आणि प्ले ऑफ गाठण्यासाठी 16 धावांची गरज होती. धोनी फलंदाजीला आठव्या क्रमांकावर आला. सहसा धोनी इतक्या खाली खेळायला येत नाही. त्यानं शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 110 मीटर षटकार मारला. यामुळं चेन्नईच्या प्ले ऑफ गाठण्याच्या आशा वाढल्या होत्या. मात्र पुढच्याच चेंडूवर त्याला यश दयालने बाद करत चेन्नईकरांचे स्वप्न तोडले.

यानंतर चेन्नई डग आऊटमध्ये बसला होता. त्यावेळी कॅमेरामनने धोनच्या चेहऱ्यावरील भावना अचूक टिपल्या. त्यानंतर धोनी ज्या प्रकारे आरसीबी खेळाडूंचे विजयाबद्दल अभिनंदन करत होता ते पाहून चाहते धोनी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करेल असा अंदाज बांधत आहेत.

MS Dhoni
IPL 2024 Rohit Sharma : मुंबई संघातील भवितव्याबाबत रोहितचा सस्पेंस ;प्रशिक्षक बाऊचर यांनी विचारलेला प्रश्न खुबीने टोलावला

धोनीने आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सामन्यानंतर तो त्याचा भावना लपवू शकला नाही. धोनीला आपली आयपीएल कारकीर्द ही शिखरावर समाप्त करायला आवडली असती. धोनी हा आयपीएल इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने 264 सामन्यात 5243 धावा केल्या आहेत. त्याचे विनिंग पर्सेंटेज सर्वात उच्च आहे.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.