IPL 2024, Qualifier 2: हैदराबादने राजस्थानला स्पर्धेतून बाहेर करताच स्टेडियममध्ये फॅनला कोसळलं रडू, Photo Viral

SRH vs RR: सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला क्वालिफायर-2 मध्ये पराभूत केल्याने त्यांचे आयपीएल 2024 मधील आव्हान संपुष्टात आले. ते पाहून एका चाहतीला रडू कोसळलं होतं.
Rajasthan Royals Fan
Rajasthan Royals FanSakal
Updated on

IPL 2024, Qualifier 2, SRH vs RR: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील क्वालिफायर-2 सामना शुक्रवारी (24 मे) पार पडला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला, ज्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबादने 36 धावांनी बाजी मारली.

त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मात्र, राजस्थान रॉयल्सचे यंदाच्या हंगामातील आव्हान मात्र संपले, त्यामुळे त्यांची दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याची प्रतिक्षा आणखी लांबली आहे.

मात्र, राजस्थानच्या या पराभवाने त्यांचे चाहते चांगलेच निराश झाले आहेत. सध्या एका चाहतीचा रडतानाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असेल्या या फोटोबद्दल सांगण्यात येत आहे की क्वालिफायर-२ सामना स्टेडियममध्ये गेलेल्या चाहतीला राजस्थान रॉयल्सला पराभूत झालेलं पाहून अश्रु आवरता आले नाहीत.

Rajasthan Royals Fan
Ambati Rayudu RCB : सीएसके आरसीबीला त्यांची एक ट्रॉफी देऊ शकते जेणेकरून ते... रायुडू असं का म्हणाला?

खरंतर राजस्थानने सुरुवात शानदार केली होती. त्यांनी पहिल्या 9 सामन्यांमधील तब्बल 8 सामने जिंकले होते. मात्र, त्यांनंतर त्यांना सलग 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, सुरुवातीच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांनी पाँइंट्स टेबलमध्ये तिसरा क्रमांक मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

प्लेऑफमध्ये एलिमिनेटर सामन्यात राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत करत क्वालिफायर-2 मध्ये स्थान मिळवले होते. परंतु, क्वालिफायर-2 मध्ये पराभव झाल्यानंतर राजस्थानला आता स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.

क्वालिफायर-2 मध्ये राजस्थानने नाणेफक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हैदराबाद प्रथम फलंदाजीसाठी उतरले. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 175 धावा केल्या. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने 34 चेंडूत 50 धावांची खेळी केली. तसेच राहुल त्रिपाठीने 37 आणि ट्रेविस हेडने 34 धावा केल्या.

Rajasthan Royals Fan
IPL 2024: काय सांगता! आयपीएल फायनलमध्ये खेळणार नाहीत टी20 वर्ल्ड कपमधील एकही भारतीय खेळाडू? जाणून घ्या कारण

राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच संदीप शर्माने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला 20 षटकात 7 बाद 139 धावाच करता आल्या. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने 21 चेंडूत 42 धावांची खेळी केली. त्याबरोबर ध्रुव जुरेलने 35 चेंडूत नाबाद 56 धावांची झुंज दिली. मात्र अन्य कोणालाच खास काही करता आले नाही. त्यामुळे राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला.

सनरायझर्स हैदराबादकडून शाहबाज अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच अभिषेक शर्माने 2 विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्स आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.