Rohit Sharma: 'रोहितने मुंबई इंडियन्ससाठी अखेरचा सामना खेळलाय...', माजी क्रिकेटपटूची खळबळजनक प्रतिक्रिया

Rohit Sharma: भारताच्या माजी क्रिकेटपटूने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समधील भवितव्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Sharma | Mumbai Indians
Rohit Sharma | Mumbai IndiansSakal
Updated on

Rohit Sharma News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा नुकतीच 74 सामन्यांनंतर संपली. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान मुंबई इंडियन्सची नेतृत्वबदलामुळे बरीच चर्चा झाली. त्यातच आता भारताच्या माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने म्हटले आहे की या हंगामादरम्यान रोहित शर्माने मुंबईकडून अखेरचा सामना खेळला आहे.

खरंतर यंदाच्या हंगामापूर्वी मुंबईने संघात मोठा बदल केला. त्यांनी रोहित शर्माला हंगामापूर्वी संघांच्या कर्णधारपदावरून हटवले आणि गुजरात टायटन्सकडून ट्रेडिंगमार्फत संघात पुन्हा घेतलेल्या हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची धूरा सोपवली.

तसेच यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये मुंबई इंडियन्सचेही नाव आहे. त्यामुळे संघावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. अशीही चर्चा होती की संघात फुट पडली आहे.

Rohit Sharma | Mumbai Indians
Shah Rukh Khan: 'माझे खेळाडू...माझी टीम...' KKR च्या विजयानंतर दोन दिवसांची शाहरुखची भावुक पोस्ट

अशातच आता माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने म्हटले आहे की रोहित शर्मा पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची शक्यता कमी आहे. तसेच त्याने मुंबई इंडियन्स पुढच्यावर्षी संघात कोणत्या खेळाडूंना कायम केले जाणार आहे, याबाबतही मत मांडले आहे.

आकाश चोप्राने त्याच्या युट्युब चॅनेलवर म्हटले, 'मला वाटते ते ईशान किशनला जाऊ देतील आणि कदाचीत राईट टू मॅच कार्ड वापरतील. कारण त्याला दिलेले १५.५ कोटी खूप जास्त पैसै आहेत. मला वाटत नाही की इशानला ते कायम करणार नाहीत.'

Rohit Sharma | Mumbai Indians
T20 World Cup: है तैयार हम...! रोहित अन् हार्दिक पांड्या अ‍ॅक्शन मोडमध्ये; BCCI ने शेअर केला 'तो' 2 मिनट 12 सेंकदाचा Video

आकाश चोप्रा पुढे म्हणाला 'मला वाटते रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सामना खेळला आहे. कदाचीत त्याला आता संघात थांबायचे नसेल किंवा फ्रँचायझी त्याला जाऊ देईल. पण मला वाटतंय की त्यांचे मार्ग वेगळे होतील. मला वाटत नही की पुन्हा रोहितला आपण मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये पाहू. असं माझं मत आहे. कदाचीत मी चूकीचाही असेल.'

दरम्यान, मुंबईच्या आयपीएल २०२४ स्पर्धेतील कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर ते पाँइंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिले. मुंबईने १४ पैकी ४ सामने जिंकले, तर १० सामन्यात पराभव स्विकारला.

तसेच रोहितने या हंगामात १० सामन्यांमध्ये ४१७ धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.