GT vs MI IPL 2023 : मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्ज विरूद्ध जी चूक केली होती. तीच चूक गुजरात टायटन्स विरूद्ध देखील केली. गोलंदाजी करताना पहिल्या 15 षटकात धावांवर अंकुश ठेवला. मात्र शेवटच्या 5 षटकात धावांची लयलूट केली. आजच्या सामन्यात देखील मुंबईच्या गोलंदाजांनी शेवटच्या 5 षटकात 77 धावा दिल्या. यामुळे पुन्हा एकदा रोहित सेनेला 207 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे.
गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर अभिनव मनोहरने 21 चेंडूत 42 धावा, राहुल तेवतियाने 5 चेंडूत 20 तर डेव्हिड मिलरने 22 चेंडूत 46 धावा ठोकल्या. मुंबईकडून पियुष चावलाने 34 धावात 2 बळी टिलले.
अर्जुन तेंडुलकरने नवीन चेंडूवर पुन्हा एकदा कमाल केली. त्याने गुजरातचा सलामीवीर वृद्धीमान साहाला 4 धावांवर बाद केले. यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न करत गुजरातला 5 षटकात 33 धावांपर्यंत पोहचवले.
पॉवर प्लेच्या पहिल्या 5 षटकात संथ सुरूवात करणाऱ्या गुजरातने शेवटच्या षटकात धडाकेबाज फलंदाजी केली. शुभमन गिलने कॅमरून ग्रीनच्या गोलंदाजीवर 17 धावा चोपत संघाचे अर्धशतक पूर्ण करून दिले.
यानंतर मात्र चावलाने पांड्याला 13 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान, आक्रमक अवतारात असलेल्या शुभमन गिलने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र कुमार कार्तिकेयने गिलची अर्धशतकी खेळी 53 धावांवर संपवली. पाठोपाठ विजय शंकर देखील 19 धावा करून बाद झाला. मात्र तो बाद होण्यापूर्वी गुजरातने आपले शतक पूर्ण केले होते.
गिल आणि विजय शंकर बाद झाल्यानंतर अभिनव मनोहर आणि डेव्हिड मिलर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या दोघांनी मुंबईच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. अभिनव मनोहरने तर 21 चेंडूत 42 धावा चोपत बघता बघता गुजरातला 170 धावांचा आकडा पार करून दिला.
दुसऱ्या बाजूने डेव्हिड मिलर देखील तुफान फटकेबाजी करत होती. त्याच्या जोडीला आता राहुल तेवतिया आला होता. या दोघांनी मेरेडिथ टाकत असलेल्या 19 व्या षटकात 19 धावा चोपल्या. त्यानंतर राहुल तेवतियाने बेहरनडॉर्फच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकत गुजरातला 200 च्या पार पोहचवले. अखेर गुजरातने 20 षटकात 6 बाद 207 धावा केल्या. तेवतियाने 5 चेंडूत 20 तर मिलरने 22 चेंडूत 46 धावा केल्या.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.