IPL 2023 Ajinkya Rahane : आयपीएल 2023 मध्ये दररोज एकना एक स्फोटक सामना पाहिला मिळत आहे. या हंगामात 4 वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आतापर्यंत सर्वोत्तम दिसत आहे. सीएसकेच्या यशात भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचाही मोठा हात आहे.
रहाणे यंदाच्या आयपीएलमध्ये नव्या रंगात दिसला. रहाणे प्रत्येक सामन्यात सुमारे 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे आणि त्याने कसोटी फलंदाजाचा टॅग पुसुन काढून आहे. आता प्रश्न असा आहे की रहाणे भारतीय टी-20 संघातही पुनरागमन करू शकेल का?
आयपीएल लिलावात चेन्नईने रहाणेवर विश्वास ठेवत 50 लाखांच्या मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात सामील केले. रहाणे या आयपीएलमध्ये जसा खेळतोय तशी अपेक्षा जगातील कोणत्याही क्रिकेट चाहत्याने केली नसेल. रहाणेने सीएसकेकडून या मोसमात पाच सामने खेळला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 52 पेक्षा जास्त सरासरी आणि 199 च्या मजबूत स्ट्राइक रेटने 209 धावा केल्या आहेत. संपूर्ण आयपीएल 2023 मध्ये स्ट्राइक रेटच्या बाबतीत दुसरा कोणताही फलंदाज रहाणेशी बरोबरी करू शकत नाही.
आता भारताच्या टी-20 संघात त्याचे पुनरागमन हा विषय आहे. या फॉरमॅटमध्ये भारतीय संघ बदलाच्या टप्प्यातून जात आहे. टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली अनेक नवीन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. रहाणेने अशीच कामगिरी करत राहिल्यास तोही पुनरागमनाचा दावा करू शकतो. विशेषत: तिसऱ्या क्रमांकासाठी तो मोठा दावेदार ठरू शकतो.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्याचवेळी आयपीएलच्या 16 व्या हंगामात या फलंदाजाची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. राहुलने टीम इंडियासाठी 5 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने केवळ 19.4 च्या सरासरीने 97 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत त्याच्या जागी संघात स्थान मिळवण्यासाठी रहाणे मोठा दावेदार ठरू शकतो.
रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध रहाणेने चमकदार कामगिरी केली. रहाणेने या सामन्यात केवळ 29 चेंडूत 71 धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने 6 चौकार आणि 5 लांब षटकारही मारले. दुखापतग्रस्त बेन स्टोक्सच्या जागी रहाणेला CSK च्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.