Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Rohit Sharma
Rohit Sharma T20 WC 24 esakal
Updated on

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप 2024 साठी भारतीय संघ घोषित होऊन चार दिवस उलटले आहेत. मात्र ज्या खेळाडूंची संघात नावे आहेत त्यापैकी अनेक खेळाडू आयपीएलमध्ये फारशी चमकदार कामगिरी करताना दिसत नाहीयेत. संघ घोषित झाल्यापासून त्यांची कामगिरी खालावल्याचं दिसून येत आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांचा देखील समावेश आहे.

Rohit Sharma
PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सने केकेआरविरूद्धचा सामना 24 धावांनी गमावला. त्यामुळे त्यांचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे स्वप्न जवळपास भंगले आहे. मुंबईचा इम्पॅक्ट प्लेअर रोहित शर्माने फक्त 11 धावा केल्या. पांड्या तर 1 धाव करून बाद झाला. त्यात त्यानं चार षटकात 44 धावा देत दोन विकेट्स मिळवल्या. रोहित शर्माने गेल्या चार सामन्यात चांगली कामगिरी केलेली नाही. त्याने राजस्थानविरूद्ध 6, दिल्लीविरूद्ध 8 आणि लखनौविरूद्ध 4 धावा केल्या होत्या.

भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवरून रोहितच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली. तो म्हणाला की, 'ज्या खेळाडूंची टी 20 वर्ल्डकप संघात निवड झाली आहे. यशस्वी जयस्वाल वगळता इतर खेळाडूंनी कोणतीही भरीव कामगिरी केलेली नाही.'

'बुमराहने केकेआरविरूद्ध 4 विकेट्स घेतल्या तर सूर्यानं 56 धावा केल्या आहेत. हे ठीक आहे मात्र रोहित शर्मा आपला कर्णधार लवकर बाद झाला. तो सलग चौथ्या सामन्यात बाद झाला आहे. राजस्थान, दिल्ली आणि लखनौविरूद्ध त्याला दुहेरी आकडाही पार करता आलेला नाही.'

Rohit Sharma
PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

तो पुढे म्हणला की, 'हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. टीम डेव्हिड आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली. कारण काय तर उजव्या अन् डाव्या हाताच्या फलंदाजांच कॉम्बिनेश असावं म्हणून जर हे कॉम्बिनेशन नसेल तर तुम्ही बॅटिंग करणार नाही का?'

भारतीय संघ आपली वर्ल्डकप मोहीम 5 जूनपासून सुरू करणार आहे. न्यू यॉर्कमधील नासाऊ काऊंन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ते आयर्लंडविरूद्ध खेळणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ 9 जूनला पाकिस्तानविरूद्ध त्याच मैदानावर भिडणार आहे. यानंतर युएसए आणि कॅनडाविरूद्ध 12 आणि 15 जूनला त्यांचा सामना होणार आहे.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.