Akash Madhwal MI vs SRH : W,W,W,W आकाशनं मुंबईच्या आशा ठेवल्या जिवंत नाहीतर विवरांत - मयांक जोडीने तर...

Akash Madhwal MI vs SRH
Akash Madhwal MI vs SRH esakal
Updated on

Akash Madhwal MI vs SRH : प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स आपले सर्वस्व पणाला लावलत असतानाच सनराईजर्स हैदराबादच्या सलामीवीरांनी 140 धावांची धडाकेबाज सलामी देत मुंबईची हवा टाईट केली होती. मात्र अखेरच्या 5 षटकात मुंबईच्या आकाश माधवालने दमदार आणि वेगवान मारा करत सनराईजर्स हैदराबादच्या धावांना ब्रेक लावला. त्याने 4 षटकात 37 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. हैदराबादकडून मयांक अग्रवालने 83 तर युवा सलामीवीर विवरांत शर्माने 69 धावा ठोकल्या.

Akash Madhwal MI vs SRH
Dwayne Bravo CSK : एप्रिल फूल दिवशी अंदाज वर्तवतात वाटतं... ब्राव्होने सीएसकेला डावलणाऱ्या 'जाणकारां'ना काढला चिमटा

सनराईजर्स हैदराबादचे सलामीवीर मयांक अग्रवाल आणि विवरांत शर्मा यांनी पॉवर प्लेमध्ये हैदराबादला अर्धशतकी मजल मारून दिली होती. या जोडीने आपली ही अर्धशतकी सलामी शतकी भागीदारीत बदलली. विवरांतने आक्रमक अर्धशतक ठोकत हैदराबादला शतकी मजल मारून दिली. त्यानंतर संपूर्ण हंगाम आऊट ऑफ फॉर्म असलेल्या मयांकनेही आपले अर्धशतक पूर्ण करत गिअर बदलला. या दोघांनी 13 व्या षटकात हैदराबादल 130 धावांपर्यंत पोहचवले. मुंबई इंडियन्सने आपले सहा गोलंदाज वापरूनही 13 व्या षटकापर्यंत एकही विकेट घेण्यात यश आले नाही.

Akash Madhwal MI vs SRH
IPL 2023 : …तर धोनीची CSK फायनल खेळणार! 'हा' योगायोग ठरणार महत्वाचा

डावाच्या 13 व्या षटकापर्यंत मुंबईला एकही विकेट मिळवता आली नाही. मात्र 14 व्या षटकात माधवालने विवरांतला 69 धावांवर बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. विवरांत बाद झाला त्यावेळी हैदराबादने 13.5 षटकात 140 धावा केल्या होत्या.

मात्र हा दिलासा मुंबईला फार काळ आनंद देऊन गेला नाही. सेट झालेल्या मयांक अग्रवालने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. त्याला साथ देण्यासाठी हेंन्रिच क्लासेन क्रिजवर आला होता. या दोघांनी 16 व्या षटकात हैदराबादला 168 धावांपर्यंत पोहचवले.

Akash Madhwal MI vs SRH
IPL 2023 : धोनीच्या चेन्नईला प्लेऑफआधी मोठा धक्का! दिग्गज ऑलराऊंडर IPL मधून बाहेर

मयांक अग्रवाल मुंबईसाठी धोक्याची घंटा वाजवत असतानाच आकाश माधवालने त्याला 83 धावांवर बाद करत हैदराबादचा सेट झालेला फलंदाज स्लॉग ओव्हरमध्ये बाद केला. मयांक अग्रवालने 8 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 46 चेंडूत 83 धावा केल्या.

यानंतर ग्लेन फिलिप्स देखील 1 धाव करून जॉर्डनची शिकार झाला. त्यानंतर माधवालने पुन्हा एखदा मुंबईसाठी कमाल केली. त्याने 19 व्या षटकात क्लासेनला 18 धावांवर बाद केले. आपल्या स्पेलच्या शेवटच्या चेंडूवर ब्रुकचा शुन्यावर त्रिफळा उडवत आपली चौथी शिकार केली. यानंतर शेवटचे षटक टाकणाऱ्या जॉर्डनने 14 धावा देत हैदराबादला 200 धावांपर्यंत पोहचण्यास मदत केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.