RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

IPL 2024, RCB vs CSK: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने चेन्नई सुपर किंग्सचे आयपीएल 2024 मधील आव्हान संपले. दरम्यान, चेन्नईचा पराभव पाहून माजी क्रिकेटपटूही भावूक झाल्याचे दिसले.
Ambati Rayudu | RCB vs CSK | IPL 2024
Ambati Rayudu | RCB vs CSK | IPL 2024Sakal
Updated on

Ambati Rayudu: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत शनिवारी (१८ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला 27 धावांनी पराभूत केले. यासह बंगळुरूने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले.

बंगळुरूला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी चेन्नईविरुद्ध १८ धावांपेक्षा जास्त फरकाने विजय मिळवण्याची गरज होती, तर चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी कोणत्याही फरकाने विजय किंवा १७ पेक्षा कमी धावांनी पराभव स्विकारण्याची गरज होती. पण हा सामना बंगळुरूने २७ धावांनी जिंकल्यामुळे बंगळुरूने विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान चेन्नईने सातत्याने पहिल्या चार क्रमांकामध्ये स्थान कायम ठेवले होते. मात्र अखेरच्या सामन्यातील पराभवाने त्यांना प्लेऑफमधून बाहेर केले. चेन्नईने प्लेऑफमध्ये न पोहचण्याची ही तिसरी वेळ होती. दरम्यान, चेन्नईच्या पराभवामुळे त्यांचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू भावूक झाला होता. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Ambati Rayudu | RCB vs CSK | IPL 2024
IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

या सामन्यावेळी अंबाती रायुडू ब्रॉडकास्टर्ससाठी समालोचन करत होता. अखेरच्या दोन चेंडूत चेन्नईला प्लेऑफसाठी पात्र ठरायला 10 धावांची गरज होती. परंतु, दोन्ही चेंडूंवर रविंद्र जडेजा मोठे फटके खेळू शकला नाही. त्यामुळे चेन्नई प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यापासून मुकले.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की चेन्नईचा हा पराभव पाहून अंबाती रायुडूही चकीत झाला होता. त्याचे डोळे पाणावल्यासारखे दिसत होते. तो चेन्नईच्या पराभवामुळे भावूकही झाल्याचे दिसून आले.

अंबाती रायुडू 2018 ते 2023 दरम्यान चेन्नईचा महत्त्वाचा भाग राहिला होता. तो 2018, 2021 आणि 2023 साली आयपीएल विजेतेपद जिंकलेल्या चेन्नईचा प्रमुख भागही होता.

Ambati Rayudu | RCB vs CSK | IPL 2024
RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

या सामन्यात बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 218 धावा करत चेन्नईसमोर विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 20 षटकात 7 बाद 191 धावा केल्या.

चेन्नईने आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यांपैकी 7 विजय आणि 7 पराभव पत्करले. त्यामुळे त्यांचे 14 पाँइंट्स झाले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की बंगळुरूनेही 7 विजय आणि 7 पराभवांसह 14 पाँइंट्स मिळवले. मात्र नेट रन रेटच्या फरकामुळे बंगळुरू चौथ्या आणि चेन्नई पाचव्या क्रमांकावर राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.