Virat Kohli Orange Cap : 'ऑरेंज कॅप IPL ट्रॉफी जिंकून देत नाही....', CSKच्या माजी खेळाडूने विराट कोहलीला पुन्हा मारला टोमणा

Ambati Rayudu on Virat Kohli Orange Cap News : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून ट्रॉफी जिंकली आहे.
Ambati Rayudu on Virat Kohli Orange Cap
Ambati Rayudu on Virat Kohli sakal

Ambati Rayudu on Virat Kohli Orange Cap : आयपीएल 2024 चा हा सतरावा हंगाम संपला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून ट्रॉफी जिंकली आहे. कोलकात्याची ही तिसरी आयपीएल ट्रॉफी आहे.

विराट कोहलीने या हंगामातच्या सुरुवातीला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली होती आणि शेवटपर्यंत एकही फलंदाज त्याला मागे टाकू शकला नाही. मात्र यावेळीही तो आपल्या संघाला ट्रॉफीपर्यंत नेऊ शकला नाही. या सगळ्या दरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा आणि भारतीय संघाचा माजी फलंदाज अंबाती रायुडूने असेच आणखी एक मोठे विधान केले आहे जे खूप व्हायरल होत आहे. या हंगामात रायडू आरसीबीला सातत्याने कोंडीत पकडत आहे.

Ambati Rayudu on Virat Kohli Orange Cap
KKR vs SRH IPL 2024 Final : पॅट कमिन्सने स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड... 'या' 4 कारणांमुळे काव्या मारन ढसाढसा रडली

आयपीएल 2024 च्या फायनलनंतर अंबाती रायुडूने कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंचे कौतुक केले, त्यादरम्यान त्याने ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या विराट कोहलीलाही टोमने मारले. अंबाती रायुडू म्हणाला की, ऑरेंज कॅपने आयपीएल ट्रॉफी जिंकली जात नाही. ट्रॉफी जिंकण्यासाठी संघाचे सहकार्य आवश्यक आहे.

रायुडू म्हणाला की, कोलकातामध्ये मिचेल स्टार्क, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन या सर्वांनी योगदान दिले आहे हे आपण पाहू शकतो, त्यानंतर केकेआर ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व खेळाडूंना थोडेफार योगदान द्यावे लागेल. ऑरेंज कॅप जिंकणारा खेळाडू कोणतीही ट्रॉफी जिंकत नाही. अंबाती रायडूच्या या विधानाला चाहते आता विराट कोहलीशी जोडत आहेत.

Ambati Rayudu on Virat Kohli Orange Cap
KKR vs SRH : 'दुर्दैवाने माझा सहकारी स्टार्क...' लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधाराने केलं मोठं वक्तव्य

विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये 15 सामने खेळले. या काळात विराटने 61.75 च्या सरासरीने 741 धावा केल्या. या मोसमात त्याच्या बॅटमधून 5 अर्धशतके आणि 1 शतक झळकले. विशेष बाब म्हणजे विराट कोहलीने 154.69 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या, ज्यात 62 चौकार आणि 38 षटकारांचा समावेश होता. या हंगामात सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्यांमध्ये विराट कोहली संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. त्याचा संघ प्लेऑफमध्येही पोहोचला होता, पण एलिमिनेटर सामना गमावून या मोसमातून बाहेर पडला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com