RCB फिमेल फॅनच्या पालकांची अमित मिश्राला का वाटते चिंता?

Amit Mishra Share RCB Female Fan picture
Amit Mishra Share RCB Female Fan picture esakal
Updated on

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील (IPL 2022) 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) 23 धावांनी पारभव केला. चेन्नईचा हा यंदाच्या हंगामातील पहिलाच विजय होता. तर आरसीबीने हंगामातील आपला दुसरा सामना गमावला. चेन्नईने आरसीबीसमोर 216 धावांचा डोंगर उभारला होता. त्या प्रत्युत्तरात आरसीबीला 20 षटकात 9 बाद 193 धावांपर्यंतच मजल मारता आली. असे असले तरी आरसीबी 5 पौकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या क्रमकांवर आहे. दरम्यान, कालच्या सामन्यावेळी आरसीबीच्या एका फिमेल (RCB Female Friend) फॅनने स्टेडियममध्ये एक पोस्टर झळकवले. सध्या ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यावरून फिरकीपटू अमित मिश्राने (Amit Mishra) फिमेल फॅनला ट्रोल केले.

Amit Mishra Share RCB Female Fan picture
CSK vs RCB : रविंद्र जडेजा ठरतोय RCB साठी 'कर्दनकाळ'

आरसीबीच्या एका फिमेल फॅनने स्टेडियममध्ये जोपर्यंत 'आरसीबी आयपीएल टायटल जिंकत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही.' असा मजकूर लिहिलेला फलक स्टेडियममध्ये झळकावला. या पोस्टरने सर्व कॅमेरामन आणि दिग्गजांचे लक्ष वेधले. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, फिरकीपटू अमित मिश्राने देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिले. याकॅप्शनद्वारे त्याने एक प्रकारे आरसीबीच्या फिमेल फॅनला ट्रोल केले तर आरसीबीला अप्रत्यक्षरित्या टोला हाणला.

Amit Mishra Share RCB Female Fan picture
कॅप्टन जडेजाने पहिला विजय धोनी नाही तर 'या' व्यक्तीला केला समर्पित

अमित मिश्राने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'खरोखर या फिमेल फॅनच्या कुटुंबियाची मला आता चिंता वाटत आहे.' विशेष म्हणजे या महिलेच्या बाजूलाच उभा असलेला एक धोनीचा चाहता हातात धोनीचे पोस्टर घेऊन उभा होता. हा चाहता देखील आरसीबीच्या फिमेल फॅनच्या पोस्टरकडे आश्चर्याने पाहत राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.