IPL 2023 : विराट कोहलीला आऊट करताना मिश्राने केली मोठी चूक; BCCI करणार कारवाई?

अमित मिश्रा कॅमेरात कैद, व्हायरल व्हिडीओनं उडाली खळबळ
amit mishra-sliva-used-rcb-vs-lsg-match-in-ipl-2023
amit mishra-sliva-used-rcb-vs-lsg-match-in-ipl-2023
Updated on

Amit Mishra RCB VS LSG IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. बेंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 2012 धावा केल्या. मात्र अखेरच्या चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सने सामना जिंकला. अमित मिश्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमुळे बीसीसीआय त्याच्यावर कारवाई ही करू शकते.

amit mishra-sliva-used-rcb-vs-lsg-match-in-ipl-2023
IPL 2023 ने बनवले करोडपती! शेतकऱ्याच्या मुलाच्या खात्यात अचानक आले 2 कोटी... स्वप्न कसं पूर्ण झालं?

लखनौ सुपर जायंट्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राने कोविड-19 शी संबंधित एक महत्त्वाचा नियम मोडला आहे. मिश्रा बॉलवर थुंकी लावताना दिसत आहे. त्याची चूक लगेच कॅमेऱ्यात कैद झाली. अंपायरने इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच षटकात त्याने विराट कोहलीची विकेटही घेतली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजीदरम्यान १२व्या षटकात ही घटना उघडकीस आली. ओव्हर सुरू करण्यापूर्वी अमित मिश्राने बॉलवर थुंकी लावली. थुंकी लावल्याने चेंडूला अतिरिक्त टर्न मिळण्यास मदत होते. याचा फायदा मिश्राजींलाही सामन्यादरम्यान झाला. त्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने विराट कोहली झेलबाद केले. यानंतर चाहते सोशल मीडियावर अमित मिश्राने जे केले ते योग्य होते का असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

amit mishra-sliva-used-rcb-vs-lsg-match-in-ipl-2023
IPL 2023 : RCBसाठी हा फ्लॉप खेळाडू ठरला व्हिलेन, LIVE मॅचमध्ये कोहलीलाही झाला राग अनावर

कोरोना महामारीच्या आगमनानंतर बॉलवर थुंकण्याच्या वापरावर आयसीसीने बंदी घातली होती. हा नियम अजूनही लागू आहे. गोलंदाजाने चुकून बॉलवर थुंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी इतर अनेक खेळाडूंनीही ही कामगिरी केली आहे. अमित मिश्राने बॉलवर थुंकल्यापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एका वृत्तानुसार, मिश्राला त्याच्या चुकीबद्दल पंचांनी फटकारले होते. बॉलही सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आला. आता सध्या तरी त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नाही, पण बीसीसीआय पुढे जाऊन कोणता कठोर निर्णय घेते का हे पाहावे लागेल.

कोरोना महामारीनंतर आयसीसीने लाळेच्या वापरावर बंदी घातली होती. चेंडूवर स्लिव्हाचा वापर केल्यास पाच धावांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच आयसीसीकडून असेही सांगण्यात आले की, दंड लावण्याआधी पंच गोलंदाज किंवा इतर खेळाडू आणि संघाला दोन इशारे देतील जे थुंकतात. यानंतर 5 धावांचा दंड आकारला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()