CSK vs KKR, Video: धोनीची मैदानात एन्ट्री झाली अन् रसेलने कानच झाकले, पाहा नक्की काय झालं

MS Dhoni Video: चेन्नई सुपर किंग्स आणि कोलाकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान धोनी मैदानात येताच रसेलला कान झाकावे लागले होते, त्यावेळी काय झालेलं पाहा.
MS Dhoni | Andre Russell | IPL 2024
MS Dhoni | Andre Russell | IPL 2024Sakal
Updated on

MS Dhoni News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 22 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने 7 विकेट्सने विजय मिळवला.

दरम्यान, या सामन्यातही स्टेडियममध्ये चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीला मोठा पाठिंबा मिळाला. कोलकाताने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला ३ धावांची गरज असताना धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला.

MS Dhoni | Andre Russell | IPL 2024
Ruturaj Gaikwad CSK vs KKR : आश्चर्य! कर्णधार ऋतुराजनं तब्बल 5 वर्षांनी केला सीएसकेकडून केला 'हा' कारनामा

धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरताच प्रेक्षकांमधून त्याच्या नावाने जयघोष करण्यात आला. त्यावेळी स्टेडियममधील आवाजाची पातळी जवळपास 125 डेसिबलपर्यंत ब्रॉडकास्टरकडून नोंदवली गेली.

हा आवाज इतका होता की कोलकाताकडून बाऊंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या आंद्र रसेलला त्याचे कानही झाकावे लागले. या प्रचंड आवाजामुळे कान झाकल्याचा त्याचा व्हिडिओ आणि फोटोही सध्या व्हायरल होत आहेत.

दरम्यान, अखेरीस धोनी 1 धावेवर नाबाद राहिला, तर त्याच्याबरोबर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड 58 चेंडूत 67 धावा करून नाबाद राहिला. त्याआधी चेन्नईकडून शिवम दुबेने 28, डॅरिल मिचेलने 25 आणि रचिन रविंद्रने 15 धावांची खेळी केली. त्यामुळे चेन्नईने 17.4 षटकातच 3 विकेट्स गमावत 138 धावांचे आव्हान पूर्ण केले.

MS Dhoni | Andre Russell | IPL 2024
IPL 2024, Video: चेपॉकवर जडेजा शो! पहिल्याच चेंडूवर कॅच घेतला अन् मग 3 विकेट्स घेत KKR च्या ताफ्यात उडवली खळबळ

या सामन्यात कोलकाताकडून गोलंदाजीत वैभव अरोराने 2 विकेट्स घेतल्या, तर सुनील नारायणने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 34 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त सुनील नारायणने 27 आणि अंगक्रिश रघुवंशीने 24 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोलकाताकडून कोणालाही 15 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.

चेन्नईकडून रविंद्र जडेजा आणि तुशार देशपांडे यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मुस्तफिजूर रेहमानने 2 विकेट्स आणि महिश तिक्षणाने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.