KKR vs SRH : रसेलचा पॉवरफूल खेळ; केकेआरची सहाव्या स्थानावर झेप

Andre Russell Powerful Show
Andre Russell Powerful Show esakal
Updated on

पुणे : आंद्रे रसलेने फलंदाजीत आणि गोलंदाजीत दमदार कामगिरी करत कोलकाता नाईट रायडर्सला सहावा विजय मिळवून दिला. केकेआरने सनराईजर्स हैदराबादचा 54 धावांनी पराभव करत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली. केकेआरचे 177 धावांचे आव्हान पार करताना हैदराबादने 20 षटकात 8 बाद 123 धावा केल्या. केकेआरकडून रसेलने 22 धावात 3 विकेट घेतल्या. फलंदाजीतही त्याने 28 चेंडूत नाबाद 49 धावा करत मोलाचे योगदान दिले. केकेआरकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर गोलंदाजीत उमारन मलिकने 33 धावात 3 बळी टिपले. (Andre Russell Powerful Show Kolkata Knight Riders Defeat Sun Risers Hyderabad IPL 2022)

Andre Russell Powerful Show
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध रोहित नाही तर हार्दिक पांड्या असणार कर्णधार?

कोलकाता नाईट रायडर्सचे 178 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सनराईजर्स हैदराबादने सावध सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र 17 चेंडूत 9 धावांची खेळी करणारा केन विल्यमसन आंद्रे रसेलच्या चेंडूवर बोल्ड झाला. पॉवर प्लेमध्ये 1 बाद 31 धावा करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, साऊदीने राहुल त्रिपाठीला 9 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.

दरम्यान, सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत संघाला अर्धशतक पार करून दिले. तो आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला असताना वरूण चक्रवर्तीने त्याला 43 धावावर बाद केले. पाठोपाठ सुनिल नारायणने देखील निकोलस पूरनला 2 धावांवर माघारी धाडत हैदराबादला चौथा धक्का दिला.

एका मागोमाग एक हैदराबादचे फलंदाज बाद होत असताना एडिन माक्ररमने एक बाजू लावून धरली होती. मात्र उमेश यादवने 32 धावांवर त्याचाही त्रिफळा उडवला. त्यामुळे केकेआरची अवस्था 5 बाद 99 अशी झाली. त्यानंतर आंद्रे रसेलने भेदक मारा करत पाठोपा दोन विकेट घेत हैदराबादची उरली सुरली आशा देखील संपवली. अखेर हैदराबादला 20 षटकात 8 बाद 123 धावांपर्यंतच मजल माराता आली.

Andre Russell Powerful Show
ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार; काय म्हणतोय सेहवाग?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरची सुरूवात खराब झाली. मार्को जेनसेनने श्रेयस अय्यरचा 7 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि नितीश राणा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र उमरान मलिकने केकेआरच्या डावाला सुरूंग लावण्यास सुरूवात केली.

त्याने पहिल्यांदा नितीश राणाला 26 धावांवर त्यानंतर अजिंक्य रहाणेला 28 धावांवर बाद करत केकेआरला दोन मोठे धक्के दिले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि सॅम बिलिंग्ज यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र उमरानने पुन्हा एकदा मोठा धक्का देत कर्णधार श्रेयस अय्यरला 15 धावांवर बाद केले.

यांनतर नटराजनने रिंकू सिंहला 5 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत केकेआरची अवस्था 5 बाद 94 अशी केली. अखेर बिलिंग्ज आणि आंद्रे रसेलने भागीदारी रचत संघाला 150 च्या पार पोहचवले. ज्यावेळी धावांची गती वाढवायची होती त्यावेळी भुवनेश्वरने बिलिंग्जला 34 धावांवर बाद केले. यामुळे सर्व जबाबदारी रसेलवर आली. रसेलने वॉशिंग्टन सुंदर टाकत असलेल्या शेवटच्या षटकात तुफान फटकेबाजी करत तीन षटकार ठोकले. रसेलने 28 चेंडूत नाबाद 49 धावांची खेळी करत केकेरआला 177 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.