Anushka Sharma RCB vs GT : अनुष्काने इन्स्टावर स्टोरी ठेवत भीती केली व्यक्त...

Anushka Sharma RCB vs GT
Anushka Sharma RCB vs GT esakal
Updated on

Anushka Sharma RCB vs GT : आयपीएल 2023 च्या शेवटच्या सुपर संडेमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यातील कोण प्ले ऑफमध्ये जाणार याचा निर्णय होणार आहे. पहिला सामना हा मुंबईत मुंबई इंडियन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. तर दुसरा सामना बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

मात्र शेवटच्या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यावर मोठे नैसर्गिक संकट आले आहे. या संकटामुळे आरसीबीच्या प्ले ऑफ गाठण्याच्या स्वप्नावर पाणी फिरू शकते. हीच भिती आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीची सपोर्ट सिस्टम असलेली अभिनेत्री अनुष्का शर्माने व्यक्त केली. तिने बंगळुरूमधील पडणाऱ्या तुफान पावसाची स्टोरी इन्स्टावर शेअर केली.

Anushka Sharma RCB vs GT
Akash Madhwal MI vs SRH : W,W,W,W आकाशनं मुंबईच्या आशा ठेवल्या जिवंत नाहीतर विवरांत - मयांक जोडीने तर...

आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्यादरम्यान हवामान खात्यानुसार, AQ वेदरनुसार, 60 ते 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी 1 नंतर बंगळुरूच्या हवामानात बदल दिसून येतील. सामन्यादरम्यान सुमारे 70 टक्के पाऊस अपेक्षित आहे. तापमानाबद्दल बोलायचे झाले तर ते किमान 23 तर कमाल 26 अंश सेल्सिअस असू शकते.

पावसामुळे हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांचे 1-1 गुण होतील. अशा स्थितीत बंगळुरूला 15 गुण मिळतील. पण मुंबई इंडियन्सने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादला हरवले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.

Anushka Sharma RCB vs GT
Dwayne Bravo CSK : एप्रिल फूल दिवशी अंदाज वर्तवतात वाटतं... ब्राव्होने सीएसकेला डावलणाऱ्या 'जाणकारां'ना काढला चिमटा

मात्र हैदराबाद संघाने मुंबईला पराभूत केल्यास आरसीबी सामना रद्द होऊनही १५ गुणांसह प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करेल. मुंबई इंडियन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याचा विचार केला तर हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी 201 धावांचे आव्हान ठेवले आहे. हैदराबादचे सलामीवीर मयांक अग्रवाल (83), विवरांत शर्मा (69) यांनी दमदार सुरूवात करून दिल्यानंतर मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश माधवालने 4 विकेट्स घेत हैदराबादचा झंजावत 200 धावांपर्यंत रोखला. विशेष म्हणजे मुंबईने याच मैदानावर यंदाच्या हंगामात दोनवेळा 200 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()