Arjun Rawat RR vs RCB : 4, 4, 4, 6, 6 अर्जुनचा दांडपट्टा अन् आरसीबीचे सामन्यात जोरदार पुनरागमन

Arjun Rawat Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore
Arjun Rawat Rajasthan Royals vs Royal Challengers Bangaloreesakal
Updated on

Arjun Rawat Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore : करो या मरो सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सावध सुरूवातीनंतर राजस्थानच्या फिरकीने आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली. आरसीबीची अवस्था 18 व्या षटकात 5 बाद 137 धावा अशी झाली असताना अर्जुन रावतने आपला दांडपट्टा सुरू करत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 11 चेंडूत 29 धावा ठोकल्या.

अर्जुनने 263.64 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे आरसीबीने 171 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने 55 तर ग्लेन मॅक्सवेलने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. राजस्थानकडून केएम आसिफ आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Arjun Rawat Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore
RR vs RCB : आरसीबीने राजस्थानचा केला तब्बल 112 धावांनी पराभव

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी सावध सुरूवात करत 6 षटकात 42 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली बॉल टू रन पद्धतीने खेळत होता. तर फाफा ड्युप्लेसिसने 19 चेंडूत 23 धावा केल्या होत्या.

पॉवर प्लेनंतर आरसीबीने लगेच आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर आसिफने विराट कोहलीला 18 धावांवर बाद केले. विराट कोहली बाद झाल्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने 69 धावांची भागीदारी रचली. ड्युप्लेसिसने हंगामातील आपले सातवे अर्धशतक ठोकले. मात्र केएम आसिफनेच ड्युप्लेसिसला देखील 55 धावांवर बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला.

Arjun Rawat Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore
Virat Kohli Mothers Day : विराट कोहलीने तिघींचा फोटो शेअर करत दिल्या मदर्स डेच्या शुभेच्छा

ड्युप्लेसिस 55 धावांवर बाद झाला त्यावेळी आरसीबीच्या 14.5 षटकात 2 बाद 119 धावा झाल्या होत्या. मॅक्सवेलने 40 धावा करून एक बाजू लावून धरली होती. मात्र राजस्थानने आरसीबीला पाठोपाठ धक्के देण्यास सुरूवात केली. झाम्पाने महिपाल रोमरोरला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर याच षटकात झाम्पाने दिनेश कार्तिकला शुन्यावर बाद करत आरसीबीची अवस्था 2 बाद 119 धावांवरून 4 बाद 120 धावा अशी केली.

आरसीबीने अवघ्या 1 धावेत 3 फलंदाज गमावल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने संघाला आधार दिला. त्याने 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र संदीप शर्माने मॅक्सवेलची ही अर्धशतकी खेळी 18 व्या षटकात संपवली. त्याने 56 धावांवर मॅक्सवेलचा त्रिपळा उडवत आरसीबीला पाचवा धक्का दिला.

मॅक्सेवेल बाद झाला त्यावेळी त्यावेळी डावातील फक्त काहीच षटके शिल्लक होती. या षटकात अर्जुन रावतने अखेरचा दांडपट्टा फिरवला. अर्जुन रावतने 11 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या तर ब्रेसवेलने 9 चेंडूत 9 धावा करत आरसीबीला 20 षटकात 5 बाद 171 धावांपर्यंत मजल मारून दिली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.