MI vs SRH IPL 2022 : मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या काल अतिशय रोमांचक असा समाना झाला. हैदराबादने सामन्यात मुंबईचा 3 धावांनी पराभव केला. प्लेऑफमधून बाहेर पडलेली मुंबई इंडियन्सने कालच्या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी दिली. हैदराबाद विरुद्ध मुंबईचा संघ दोन युवा खेळाडूंसह मैदानात उतरला होता. पण त्यात अर्जुन तेंडुलकरला खेळवण्यात आलं नाही. अर्जुन कधी पदार्पण करणार यांची सर्व चाहत्यांना प्रतीक्षा आहे.(Arjun Tendulkar Debut IPL Rohit Sharma Statement)
अर्जुन तेंडुलकर खेळणार का नाही ? यावर कर्णधार रोहित शर्माने मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अर्जुन आपल्याला खेळताणा दिसू शकतो. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या नाणेफेक दरम्यान रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही सतत नवीन खेळाडूंना संधी देणार आहे, ज्यामुळे पुढील हंगामासाठी आम्हांला काही गोष्टी स्पष्ट होतील. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मयंक मार्कंडेय आणि संजय यादव यांना संधी दिले. असच शेवटच्या सामन्यातही काही नवीन खेळाडूंना संधी दिली जाईल. मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे.
अर्जुन तेंडुलकर रोहितच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर ट्रेंड करू लागला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अर्जुन नक्की खेळणार असा अंदाज लावल्या जात आहे. मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला ३० लाख रुपयांना खरेदी केले होते.
मुंबई इंडियन्सने गेल्या हंगामातही अर्जुनला २० लाख रुपयांना खरेदी केले होते, पण त्याला एकही सामना खेळावला नव्हता, आणि या हंगामातही तसेच घडले आहे. मुंबई इंडियन्सने मात्र अर्जुन तेंडुलकरचा फोटो सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट केला आहे. असे संकेत मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.