Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरच्या जर्सीचा नंबर 24 च का... या नंबरचं सचिनशी काय आहे खास नातं?

Arjun Tendulkar IPL Jersey No 24
Arjun Tendulkar IPL Jersey No 24 esakal
Updated on

Arjun Tendulkar IPL Jersey No 24 : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. तो पहिला सामना KKR विरुद्ध खेळला. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लीगमध्ये त्याने पहिली विकेट घेतली. अर्जुन जर्सी नंबर-24 घालून खेळायला उतरला. त्याचे वडील सचिन तेंडुलकर 10 नंबरची जर्सी घालायचे. मग अर्जुन 24 नंबरची जर्सी का घालतो? या मागचे कारण जाणून घेऊया.

Arjun Tendulkar IPL Jersey No 24
Virat Kohli IPL 2023 : ... म्हणून विराटने संधी असूनही RCB सोडलं नाही; किंग कोहलीने केला मोठा खुलासा

अर्जुन तेंडुलकरने ज्यावेळी मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केले. त्यावेळी तो कशी कामगिरी करतोय याकडे अख्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. याचबरोबर अर्जुन तेंडुलकरचा जर्सीचा क्रमांक कोणता असेल याची देखील सर्वांना उत्सुकता होती. सचिन तेंडुलकर 10 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरत होता. त्यामुळे या क्रमांकाला एक वेगळेच ग्लॅमर निर्माण झाले आहे. मात्र अर्जुन तेंडुलकरने 24 या क्रमांकाची निवड केली. या क्रमांकाचे खास कनेक्शन हे सचिन तेंडुलकरशी आहे.

Arjun Tendulkar IPL Jersey No 24
Arjun Sachin Tendulkar : बापाला जमलं नाही ते अर्जुननं करून दाखवलं; सचिनही म्हणाला अखेर तेंडुलकर...

असा अंदाज वर्तवला जात आहे की अर्जुन तेंडुलकरने जर्सी क्रमांक 24 निवडायची दोन कारणे आहेत. एक म्हणजे त्याचे वडील सचिन तेंडुलकरचा जन्म हा 24 एप्रिल 1973 ला झाला होता. तर अर्जुन तेंडुलकरचा जन्म देखील 24 सप्टेंबर 1999 ला झाला आहे. यामुळेच अर्जुन तेंडुलकरने आपला जर्सी क्रमांक हा 24 निवडला असावा.

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.