DC vs MI Arjun Tendulkar : आज अर्जुन तेंडुलकरचं नशीब उघडणार... रोहित शर्मा संधी देणार?

DC vs MI Arjun Tendulkar
DC vs MI Arjun Tendulkaresakal
Updated on

DC vs MI Arjun Tendulkar : आयपीएल 2023 च्या 16 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन तळातील एकही सामना न जिंकलेले संघ भिडणार आहेत. त्यामुळे आज दोन्ही पैकी एका संघाचे विजयी खाते उघडणे निश्चित आहे. गेल्या दोन सामन्यात पदरी पराभव पडलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आजच्या सामन्यात प्लेईंग 11 गोळा करणे आव्हानात्मक असेल.

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा खांद्यावर असलेला जोफ्रा आर्चर दुखापग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत डावखुरा अष्टैपूल खेळाडू अर्जुन तेंडुलकरचे बहुप्रतिक्षित आयपीएल पदार्पण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

DC vs MI Arjun Tendulkar
IPL 2023 : विराट कोहलीला आऊट करताना मिश्राने केली मोठी चूक; BCCI करणार कारवाई?

मुंबईचा गेला सामना चेन्नई सुपर किंग्जसोबत झाला होता. या सामन्यात रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरला इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीत ठेवले होते. मात्र ऐनवेळी रोहित शर्माने कुमार कार्तिकेयला संधी दिली. यापूर्वीच्या पहिल्या सामन्यात अर्जुन मनगटाच्या दुखापतीमुळे सामना खेळण्यासाठी फिट नव्हता.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक मार्क बाऊचरने जोफ्रा आर्चरबद्दल माहिती दिली. तो म्हणाला, 'आम्ही कायम आमच्या खेळाडूची काळजी घेतो. जर तो खेळण्यासाठी तयार नसला ती आम्ही त्याची काळजी घेतो. सध्या आम्ही आर्चरबाबत आम्ही आमच्या टीमकडून वैद्यकीय सल्ला घेत आहोत. आम्हाला आशा आहे की लवकरच निवडीसाठी उपलब्ध होईल.'

DC vs MI Arjun Tendulkar
RCB हरले पण विराटने रचला इतिहास, T20 क्रिकेटमध्ये केला हा मोठा पराक्रम

अर्जुन तेंडलुकरचे होणार पदार्पण?

अर्जुन तेंडुलकर गेल्या दोन वर्षापासून मुंबई इंडियन्सच्या संघासोबत आहे. मात्र अजून त्याने आपला पहिला आयपीएल सामना देखील खेळलेला नाही. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण करण्याची नेटकरी चातकासरखी वाट पाहत आहेत.

आयपीएल 2023 मधील मुंबईच्या RCB विरूद्धच्या पहिल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर मनगटाच्या दुखापतीमुळे संघ निवडीसाठी फिट नव्हता. दुसऱ्या चेन्नई विरूद्धच्या सामन्यात त्याचे नाव इम्पॅक्ट प्लेअरमध्ये होते. मात्र त्याला संधी मिळाली नाही.

मुंबई इंडियन्सने पाठोपाठ दोन सामने गमावल्यामुळे रोहित शर्मा अर्जुन तेंडुलकरला संधी देण्याची शक्यता आहे. अर्जुन तेंडुलकर डावखुरा मध्यम गती गोलंदाज आहे. तसेच तो आपल्या फलंदाजीच्या क्षमतेने संघाची फलंदाजीचा डेप्थ वाढवून शकतो.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.