Arjun Tendulkar MI vs LSG : हंगामातील पहिल्याच सामन्यात अर्जुन झाला रिटायर्ड हर्ट, षटकही नाही केलं पूर्ण

Arjun Tendulkar
Arjun Tendulkar MI vs LSGesakal
Updated on

Arjun Tendulkar MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला वानखेडे स्टेडियमवर एमआय विरुद्ध एलएसजी सामना सुरू असतानाच दुखापत झाली. IPL 2024 मध्ये आत्तापर्यंत बेंचवर असलेल्या अर्जुन तेंडुलकरला जसप्रीत बुमराहच्या जागी संघात समावेश करण्यात आला होता. तिसऱ्या षटकातील दोन चेंडू टाकल्यानंतर अर्जुन संघाच्या डगआऊटमध्ये परतला तर रोहित शर्माने त्याच्या जागी मैदानात उतरला.

Arjun Tendulkar
IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

लखनौ विरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर मैदानावर संघर्ष करताना दिसला. ज्यानंतर फिजिओने मैदानावर धाव घेतली. अर्जुनने त्यानंतर षटक अर्धवट सोडून पॅव्हेलियन गाठले. नमन धीरने त्याचे षटक पूर्ण केले. अर्जुलच्या पायात गोळे येत असल्याने त्याला मैदान सोडावे लागले असे दिसत आहे.

अर्जुनने आपल्या पहिल्या स्पेलची आक्रमक सुरुवात केली, ज्यात मार्कस स्टॉइनिसची जवळपास विकेट काढली होती. त्याने स्टॉयनिसला खुन्नस देखील दिली. पंचांनी स्टॉयनिसला बाद देऊनही अर्जुन दुर्दैवी ठरला. स्टॉयनिसने डीआरएस घेतला अन् तिसऱ्या पंचांनी निर्णय बदलला. तेंडुलकरने आयपीएल 2024 मधील त्याच्या पहिल्याच सामन्यात 2.2 षटकात 22 धावा दिल्या.

Arjun Tendulkar
Virat Kohli: विराटने टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीला फलंदाजी करावी की तिसऱ्या क्रमांकावर? माजी क्रिकेटपटूंच काय मत

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर संथ सुरूवातीनंतर लखनौने षटकात 6 बाद 214 धावा केल्या. निकोलस पूरनने 75 धावांची आक्रमक खेळी केली. तर लखनौचा कर्णधार केएल राहुलने 41 चेंडूत 55 धावांचे योगदान दिले. मुंबईकडून पियुष चावलाने चांगला मारा करत 3 विकेट्स घेतल्या.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.