मुंबई: आयपीएलचा मेगा लिलाव (IPL 2022 Auction) नुकताच बंगळूरमध्ये पार पडला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात दुसऱ्या दिवशीच्या अखेपर्यंत खेळाडूंना आपल्या गोटात खेचण्यासाठी संघांमध्ये स्पर्धा लागली होती. लिलावाच्या शेवटच्या टप्प्यात सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जून तेंडुलकरचे (Arjun Tendulkar) नाव पुकारण्यात आले. त्यावेळी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याच्यावर 30 लाखाची बोली लावत पुन्हा एकदा आपल्या संघात घेतले.
मात्र लिलावात 30 लाखाला विकला गेलेला अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे. ज्यावेळी मुंबई इंडियन्सने अर्जून तेंडुलकरवर बोली लावण्यास सुरूवात केली त्यावेळी त्याला मुंबई बेस प्राईस 20 लाखालाच खरेदी करेल असे वाटत होते. मात्र लिलावात अचानक गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) उडी घेत मुंबई इंडियन्सला आश्चर्याचा धक्का दिला. गुजरात टायटन्सने 25 लाखांची बोली लावल्याने मुंबईला 30 लाखांची बोली लावावी लागली. त्यामुळे अर्जून तेंडूलकरचा भाव वधारला.
जरी अर्जून तेंडुलकरचा भाव वधारला असला तरी सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रोल झाला. मुंबई इंडियन्सने इन्स्टाग्रामवर अर्जून तेंडुलकरचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत अर्जून तेंडुलकरने मुंबई इंडियन्सचे आभार मानले. मात्र या व्हिडिओवर एका युजरने 'तू तुझ्या वडिलांचे आभार मानायला हवेस' अशी कमेंट केली. तर दुसऱ्या युजरने 'तू कायम मुंबई इंडियन्समध्येच राहणार आहेस. ते तुला खेळवणार नाहीत ही गोष्ट वेगळी.' तर एका युजरने जर मुंबई इंडियन्स पुढची बोली लावली नसती तर तू आता फाफडा जिलेबी खात असतास.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.