टीम इंडियामध्ये यॉर्कर किंग बुमराहची जागा धोक्यात? 'या' गोलंदाजाची होणार एन्ट्री!

पंजाब किंग्जचा एक गोलंदाज आहे जो आगामी दक्षिण आफ्रिका मालिकेत टीम इंडियासाठी पदार्पण
 arshdeep singh best death over specialist ipl 2022
arshdeep singh best death over specialist ipl 2022
Updated on

आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. लीगमधून दरवर्षी भारताचे अनेक युवा खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये स्थान मिळते. हा आयपीएल 2022 चा हंगामा संपल्यानंतर अनेक खेळाडू टीम इंडियासाठी खेळताना दिसतील. विशेषत म्हणजे पंजाब किंग्जचा एक गोलंदाज आहे जो आगामी दक्षिण आफ्रिका मालिकेत टीम इंडियासाठी पदार्पण करताना दिसेल. आयपीएलमध्ये हा खेळाडू अप्रतिम गोलंदाजी करताना दिसला आहे.(Arshdeep Singh Best Death Over Specialist IPL 2022)

 arshdeep singh best death over specialist ipl 2022
RCB vs PBKS : पंजाबची गुणतालिकेत मोठी उडी, RCB ची झाली गोची

टीम इंडियाचा यॉर्कर किंग वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अचूक यॉर्कर बॉल फेकण्यासाठी ओळखला जातो. आयपीएल 2022 मध्ये युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हे काम उत्तम प्रकारे यॉर्कर करत आहे. पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) या हंगामात उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. या हंगामात अर्शदीप शेवटच्या षटकांमध्येही किमी धावा देत आहे. अर्शदीप या हंगामात बुमराहपेक्षा अधिक यॉर्कर गोलंदाजी केले आहे, त्यामुळे ही चमकदार कामगिरी त्याच्यासाठी लवकरच भारतीय संघाचे दरवाजे उघडू शकते.

 arshdeep singh best death over specialist ipl 2022
VIDEO: पाटीदारचा चेंडू थेट वृद्धाच्या डोक्यात; कोहलीला 'काका'ची चिंता

आयपीएलमध्ये गेल्या दोन हंगामात अर्शदीप सिंगची कामगिरीही अप्रतिम करत आहे. अर्शदीपने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत, परंतु त्याने केवळ 7.69 च्या इकॉनॉमीमध्ये धावा खर्च केल्या आहेत, जे संघासाठी सामने जिंकण्यासाठी खूप उपयुक्त आहे. अर्शदीप सिंगने 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि गेल्या अनेक हंगामांपासून तो पंजाब किंग्सचा (PBKS) संघाचा महत्त्वाचा भाग होता. आयपीएलमध्ये सर्वोत्तम डेथ ओव्हर गोलंदाजांपैकी एक म्हणून अर्शदीपचा उदय झाला आहे. अर्शदीप सिंगने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 35 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8.39 च्या इकॉनॉमीने 37 विकेट्स घेतल्या आहे. आयपीएलमध्ये एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रमही त्याने केला आहे. गेल्या हंगामात अर्शदीप सिंगने 12 सामन्यात 18 विकेट घेतल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.