Ashish Nehra IPL 2023 : नेहराच्या फुटबॉल स्टाईल कोचिंगमुळे गुजरात आयपीएल फायनल हरली?

Ashish Nehra Football Style Coaching
Ashish Nehra Football Style Coachingesakal
Updated on

Ashish Nehra IPL 2023 Coaching Style : आयपीएलच्या 16 व्या हंगामात गुजरात टायटन्सचे सलग दुसरे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. रविंद्र जडेजाने शेवटचे षटक टाकणाऱ्या मोहित शर्माच्या शेवटच्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत चेन्नईला आपले पाचवे विजेतेपद जिंकून दिले. सामना शेवटच्या षटकात 13 धावा असा आला होता. मोहित शर्माने शेवटच्या षटकातील पहिले चार चेंडू चांगले टाकले होते. त्यामुळे सामना 2 चेंडूत 10 धावा असा आला होता. हे आव्हान सीएसकेसाठी फार सोपे नव्हते. मात्र मोहितने चार चेंडू टाकल्यानंतर ब्रेक घेतला अन् तिथेच सामना फिरला.

Ashish Nehra Football Style Coaching
Anil Kumble Ambati Rayudu : ती तर मोठी चूक... रायुडूने निवृत्ती घेताच कुंबळेने जखमेवर चोळले मीठ

ब्रेकमध्ये मोहित शर्माच्या भोवती हार्दिक पांड्या, आशिष नेहराचा संदेश घेऊन आलेला जयंत यादव यांचा गराडा पडला. तेथेच माशी शिंकली अन् जडेजाने मोहितला पाचव्या चेंडूवर षटकार आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारत सामना जिंकून दिला. यानंतर समालोचन करणाऱ्या केव्हिन पिटरसनने यावर प्रश्न उपस्थित केले.

तो म्हणाला की, 'यामुळे मोहित शर्माने लय गमावली का बिश (इआन बिशन)? कोणीतरी मैदानावर जाणं ही घटना मोहितची लय बिघडवणारी ठरली? त्याने त्याच्या झोनमध्येच रहायला हवे होते जेणेकरून तो त्याचे स्किल्स चांगल्याप्रकारे वापरू शकला असता.'

Ashish Nehra Football Style Coaching
Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडच्या हातावर सजली मेहंदी, Photo Viral

भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी देखील स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हाच मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, 'त्याने पहिले तीन - चार चेंडू उत्तम टाकले होते. मात्र त्याने पाणी पिण्यासाठी अचानक ब्रेक घेतला ते अनाकलनीय होते. षटकाच्या मधेच पाणी पाठवण्यात आले. त्यानंतर हार्दिक पांड्या जवळ आला त्याने काहीतरी सांगितले. तुम्हाला माहिती आहे का गोलंदाज लयीत असतो त्यावेळी त्याला कोणीही काहीही सांगण्याची गरज नाही.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'त्याच्या जवळ जाणे, त्याच्याशी बोलणे मला वाटते की ही योग्य गोष्ट नव्हती. कारण तो अचानक इकडे तिकडे पाहू लागला. ब्रेकपूर्वी त्याचे मन एकाग्र होते. मला वाटते की त्यांनी जे काही केले ती योग्य कल्पना नव्हती. कारण त्यानंतर त्याने धावा दिल्या.'

गुजरातचा कोच आशिष नेहराने मैदानातील गोष्टी बाहेरून हाताळल्याची ही पहिली घटना नाहीत. तो या हंगामात कामय सीमारेषेवरून मैदानातील निर्णयांवर प्रभावित करण्याचा प्रयत्न करताना दिसला. तो कर्णधाराला क्षेत्ररक्षणामधील बदल सुचवत होता. तो सीमारेषेजवळ उभा राहून गोलंदाजांशी बोलत होता. तो फलंदाजांशी हातवारे करत काहीतरी सुचवत होता.

Ashish Nehra Football Style Coaching
Thailand Open : ऑल इंग्लंड विजेत्यावर लक्ष्य सेनचा शानदार विजय

आशिष नेहरा हा 2022 मध्ये गुजरात टायटन्सचा कोच झाला. गुजरातने पहिल्याच हंगामात आयपीएल टायटल पटकावले. मात्र नेहरा स्वतःला सगळं येतं असं कधीही म्हणत नाही. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मी सुपर कोच नाही. मी एक सामन्य माणूस आहे. मी मैदानाबाहेर बसतो आणि प्रेक्षकांप्रमाणे सामना पाहतो. लोकं संघ जिंकला की अशा चांगल्या गोष्टी बोलतात. प्रत्येक कोच सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी कष्ट करत असतात.'

नेहराची कोचिंग स्टाईल ही वेगळी आहे. प्ले ऑफमधील दाखल झालेल्या संघातील इतर कोच स्टिफन फ्लेमिंग, मार्क बाऊचर आणि अँडी फ्लॉवर हे डग आऊट सोडत नव्हते. ते मैदानावरील कर्णधारांच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नव्हते. मात्र नेहरा हा कायम सीमारेषेवर असतो.

दिल्लीचा हंगामी कर्णधार डेव्हिड वॉर्नर ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या कार्यक्रमात बोलताना म्हणाला होता की, 'नेहरा हा फुटबॉल कोच सारखा वाटतो. तो सीमारेषेवर असतो. मला ते आवडले ही नवी गोष्ट आहे. हे नव्या प्रकारचे कोचिंग आहे. टी 20 चा कोच असाच असला पाहिजे.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()