आयपीएलच्या सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबचा 17 धावांनी पराभव करून प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी आपल्या आशा जिवंत ठेवली आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. मात्र फलंदाजाला काही चांगली कामगिरी करता आली नाही. (Axar Patel Gets Special Achievement ipl History)
दिल्लीकडून लॉर्ड शार्दुल ठाकुरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या, परंतु सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने एक विशेष कामगिरी केली. जेव्हा अक्षर पटेलने पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालचा शून्यावर तंबूत पाठवलं, तेव्हा त्याने आयपीएलमधील आपले शंभर विकेट्स पूर्ण केल्या. अक्षर पटेलने आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या 121 सामन्यात 101 विकेट घेतल्या आहेत. पंजाबविरुद्ध या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या, पण आणखी एक खास गोष्ट म्हणजे अक्षर पटेल आयपीएलच्या इतिहासात शंभर विकेट घेणारा केवळ चौथा गोलंदाज ठरला आहे.
झहीर खानने IPL मध्ये 102 विकेट्स घेतल्या आहे. तर गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराने 106 विकेट्स घेतल्या आहेत. अक्षर पटेलच्या निशाण्यावर आता हे दोघे पण आहेत. काही दिसवात पटेल या दोघांना मागे टाकेल. त्यानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलं.
आयपीएलमध्ये आतापर्यंत शंभर किंवा त्याहून अधिक बळी घेणारे चारही गोलंदाज भारताचे आहेत. रवींद्र जडेजाने पहिले स्थानावर काबीज करील आहे. रवींद्र जडेजाने आतापर्यंत 210 सामन्यांत 132 बळी घेतले आहेत. आता अक्षर पटेलची खरी लढत आता रवींद्र जडेजासोबत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.