IPL 2022 : गंभीरने आयुष बडोनीला दिलेला 'उलटा' सल्ला ठरला फायदेशीर

Ayush Badoni reveal what tips Gautam Gambhir gave
Ayush Badoni reveal what tips Gautam Gambhir gave ESAKAL
Updated on

गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध लखनौ सुपर जायंटचे (Lucknow Super Giants) एक एक करून सगळे महारथी पॅव्हेलियनमध्ये पोहचत होते त्यावेळी अवघ्या 22 वर्षाच्या आयुष बदोनीने (Ayush Badoni) डाव सावरला होता. आयपीएल (IPL 2022) पदार्पण करणाऱ्या बदोनीने 54 धावाची खेळी करून लखनौ सुपर जायंटला 150 चा टप्पा पार करून दिला होता. त्याने दीपक हुड्डासोबत महत्वपूर्ण भागीदारी रचली. दरम्यान आयुष बदोनीने लखनै सुपर जायंटचा मेंटॉर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) कोणता कानमंत्र दिला होता याची माहिती दिली.

Ayush Badoni reveal what tips Gautam Gambhir gave
Video: सामन्यापूर्वी संगकाराने संजूची घेतली 'शिकवणी'

आयुष बदोनीने गुजरात टायटन्स विरूद्धच्या आकर्षक खेळीनंतर मेंटॉर गौतम गंभीरची तोंडभरून स्तुती केली. तो म्हणाला, 'गौतम भाईन मला खूप पाठिंबा दिला. त्याने मला सल्ला दिला की मी फक्त माझा नैसर्गिक खेळ करावा याचबरोबर गंभीरने मला आश्वास्त केले की त्याला एखाद्या सामन्यातच संधी मिळेले असे होणार नाही. तुला भरपूर संधी दिली जाईल असे सांगितले.'

Ayush Badoni reveal what tips Gautam Gambhir gave
IPL 2022 : 'कावरी-बावरी' झाली हार्दिकची पत्नी; व्हिडिओ व्हायरल

सहसा मेंटॉर आणि कोच हे नव्या खेळाडूला परिस्थितीप्रमाणे खेळण्याचा सल्ला देतात. मात्र बदोनी गंभीरने याच्या उलटा सल्ला दिल्याचे सांगितले. तो म्हणाला की, 'गंभीरने मला सांगितले की तुला परिस्थितीनुसार खेळ करण्याची गरज नाही. त्यासाठी संघात वरिष्ठ खेळाडू आहेत. तुला फक्त तुझा नैसर्गिक खेळ करायचा आहे.' बदोनी आपल्या लिलावाबाबत म्हणाला की, गेल्या तीन वर्षापासून माझे नाव आयपीएल लिलावात येत होते. मात्र मला कोणता संघ विकत घेत नव्हता. त्यामुळे ज्यावेळी माझे नाव लिलावात पुकारण्यात आले त्यावेळी माझ्या ह्रदयाचे ठोके वाढले होते. मला काही माहिती नव्हते. मी दोन तीन संघांसाठी ट्रायल्स दिल्या होत्या. दोन ती वर्षापासून मला कोणी विकत घेत नव्हते.

Ayush Badoni reveal what tips Gautam Gambhir gave
VIDEO : गिलचा सुंदर कॅच; 83 च्या वर्ल्ड कपमधील आठवणीला उजाळा

बडोनी पुढे म्हणाला की, 'मी लखनौ टीमचा आभारी आहे की त्यांनी माझी निवड केली. त्यामुळे मला चांगले प्रदर्शन करण्याची आणि टीमच्या विजयात योगदान देण्याची गरज आहे. मी माझ्या परीने माझे सर्वस्व देईन.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.