LSG vs DC : बदोनीने बदडले! लखनौचा दिल्लीवर निसटता विजय

Ayush Badoni Shine Lucknow Super Giant Won Nail Biting Match
Ayush Badoni Shine Lucknow Super Giant Won Nail Biting MatchESAKAL
Updated on

मुंबई : लखनौ सुपर जायंटने (Lucknow Super Giant) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 7 विकेट्सनी पराभव करत तिसरा विजय साजरा केला. लखनौने दिल्लीचे 150 धावांचे आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण केले. लखनौकडून क्विटंन डिकॉकने दमदार बॅटिंग करत 51 चेंडूत 80 धावा केल्या. मात्र तो बाद झाल्यानंतर सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला होता. लखनौला अखेरच्या षटकात विजयासाठी 5 धावांची गरज होती त्यावेळी नव्याने क्रिजवर आलेल्या आयुष बदोनीने (Ayush Badoni) चौकार मारत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर षटकार मारत विजय लखनौच्या पारड्यात टाकला.

Ayush Badoni Shine Lucknow Super Giant Won Nail Biting Match
VIDEO : डेव्हिड वॉर्नर तर बिश्नोईची 'आवडती' शिकार

दिल्लीने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंटने चांगली सुरुवात केली. सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल यांनी पॉवर प्लेमध्ये 48 धावांपर्यंत मजल मारली. यात आक्रमक शैलीत खेळणाऱ्या डिकॉकच्या 36 धावांचे योगदान होते. या दोघांनी लखनौसाठी 73 धावांची दमदार सलीमी दिली.

Ayush Badoni Shine Lucknow Super Giant Won Nail Biting Match
IPL 2022 : रोहित वडापाव वाद अन् विरेंद्र सेहवाग; काय आहे नेमकं प्रकरण

त्यानंतर कुलदीप यादवने लखनौला पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार केएल राहुलला 24 धावांवर बाद केले. त्यानंतर डिकॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र ललित यादवने राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या एलव्हिन लुईसला 5 धावांवर बाद करत लखनौला दुसरा धक्का दिला. यानंतर लखनौची धावगती मंदावली. दरम्यान, डिकॉकने स्लो खेळपट्टीवर सावध पवित्रा घेतला. हुड्डाने देखील सावध फलंदाजी केली. कुलदीपने डिकॉकला 80 धावांवर बाद केले. यानंतर सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. लखनौला शेवटच्या षटकात 5 धावांची गरज होती.

मात्र शार्दुल ठाकूरने पहिल्याच चेंडूवर 11 धावा करणाऱ्या दीपक हुड्डाला बाद केले. मात्र त्यानंतर आलेल्या आयुष बदोनीने चौथ्या चेंडूवर चौकार मरत सामना लखनौच्या पारड्यात टाकला. त्यानंतर षटकार मारत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

Ayush Badoni Shine Lucknow Super Giant Won Nail Biting Match
IPL 2022 : आता मुंबई इंडियन्स देखील 'कमिन्स मार्गा'वर चालणार

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने दमदार सुरुवात केली. सलामीवीर पृथ्वी शॉने (61) धडाकेबाज फलंदाजी करत दिल्लीला पॉवर प्लेमध्ये 52 धावा केल्या. मात्र त्यानंतर रवी बिश्नोई आणि कृष्णाप्पा गौतमने दिल्लीला धक्के दिले. बिश्नोईने डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉव्हेलला बाद केले. तर कृष्णाप्पा गौतमने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या पृथ्वी शॉला 61 धावांवर बाद केले. यानंतर आलेल्या सर्फराज खान (36) आणि ऋषभ पंतने (39) आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटच्या तीन षटकात दिल्लीच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत दिल्लीला 149 धावात रोखले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.