WTC Team India Squad Ajinkya Rahane : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. 15 सदस्यीय संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.
5 वेगवान गोलंदाज, 3 फिरकीपटू, 1 यष्टिरक्षक आणि 6 फलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या जागी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला आहे. रहाणेला आयपीएल-2023 मधील त्याच्या शानदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. तब्बल 15 महिन्यांनंतर तो टीम इंडियात परतला आहे.
अजिंक्य रहाणेने यावेळी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आपल्या आक्रमक वृत्तीमुळे सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. रहाणेने रविवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 29 चेंडूत 71 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यामुळे चेन्नईने सामना 49 धावांनी जिंकला. या मोसमातील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले.
या 34 वर्षीय फलंदाजाला चेन्नईने लिलावात त्याची मूळ किंमत 50 लाख रुपयांना विकत घेतली होते. त्याचबरोबर मर्यादित षटकांच्या संघासाठी भारताचे पुनरागमनाचे दरवाजेही उघडले आहेत. भारताकडून 2016 मध्ये त्याने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला, तर 2018 पासून तो एकही वनडे खेळला नाही.
रहाणेची कसोटी कारकीर्द कशी राहिली?
अजिंक्य रहाणेने टीम इंडियासाठी 82 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 38.52 च्या सरासरीने 4931 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 188 आहे. रहाणेच्या नावावर 12 शतके आणि 25 अर्धशतके आहेत. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
भारतीय संघ खालीलप्रमाणे - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद. सिराज, मो. शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.