IPL 2024 संपल्यानंतर BCCIची मोठी घोषणा! ग्राउंड स्टाफला दिलं मोठं बक्षीस

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पर्धा संपल्यानंतर एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
Bcci Jay Shah Announces Prize Money For Pitch Curators Ground Staff Ipl 2024
Bcci Jay Shah Announces Prize Money For Pitch Curators Ground Staff Ipl 2024
Updated on

आयपीएल 2024 संपली आहे आणि कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पर्धा संपल्यानंतर एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्याने सर्व 10 आयपीएल ठिकाणाच्या ग्राउंड्समन आणि क्युरेटर्सना सन्मानित करण्यासाठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. (Bcci Jay Shah Announces Prize Money For Pitch Curators Ground Staff Ipl 2024 )

Bcci Jay Shah Announces Prize Money For Pitch Curators Ground Staff Ipl 2024
Mitchell Starc KKR vs SRH : माझं करियर संपत आलं तरी मी पुन्हा येईन... 24 करोड किंमतीच्या खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत

जय शाह यांनी ट्विट करून लिहिले की, 'या टी-20 हंगामाचे खरे हिरो (ज्यांच्याबद्दल फारसे बोलले गेले नाही) हे ग्राउंड स्टाफ आहेत. ज्यांनी खराब हवामानातही चांगली खेळपट्टी दिली. त्यांच्या कामाचे महत्त्व लक्ष्यात घेऊन आम्ही सर्व 10 नियमित आयपीएल स्थळांच्या प्रत्येक ग्राउंड स्टाफला आणि पिच क्युरेटरला 25 लाख रुपये दिले जातील असे ठरवले आहे. आणि तीन अतिरिक्त ठिकाणांसाठी 10 लाख रुपये दिले जातील. तुमच्या मेहनतीबद्दल धन्यवाद.

Bcci Jay Shah Announces Prize Money For Pitch Curators Ground Staff Ipl 2024
KKR vs SRH IPL 2024 Final : पॅट कमिन्सने स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड... 'या' 4 कारणांमुळे काव्या मारन ढसाढसा रडली

आयपीएल 2024 चा शेवटचा सामना चेपॉक स्टेडियम चेन्नई येथे खेळला गेला, ज्यामध्ये केकेआरने बाजी मारली. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अंतिम सामन्यात ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांची जादू चालली नाही. ट्रॅव्हिस हेड गोल्डन डक ठरला, तर अभिषेक शर्माही अवघ्या 2 धावांवर बाद झाला.

हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावा केल्या. अशाप्रकारे हैदराबाद केवळ 113 धावांवर गडगडले. सोपे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआर संघाने अवघ्या 10.3 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने नाबाद 52 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.