IPL Sponsorship : चीनसाठी IPL चे दरवाजे बंद? स्पॉन्सरशिपवर BCCI ने घेतला मोठा निर्णय

BCCI likely to ban Chinese companies from bidding for IPL Title sponsorship rights cricket news in marathi
BCCI likely to ban Chinese companies from bidding for IPL Title sponsorship rights cricket news in marathi sakal
Updated on

IPL Title sponsorship : इंडियन प्रीमियर लीग 2024 ची बीसीसीआयने जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकताच दुबईमध्ये मिनी लिलाव संपला, जिथे खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला. आता बीसीसीआयने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल 2024 साठी टायटल स्पॉन्सरचा शोध सुरू आहे, यावेळी बीसीसीआय चीनला टायटल स्पॉन्सरशिपसाठी बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

BCCI likely to ban Chinese companies from bidding for IPL Title sponsorship rights cricket news in marathi
SA vs IND 1st Test : संघाला मोठा धक्का! पहिल्याच दिवशी कर्णधार जखमी; आज खेळण्यावर सस्पेंस

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयने काढलेल्या टेंडरमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की, ज्या देशांचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध नाहीत त्यांना या निविदेत महत्त्व दिले जाणार नाही.

BCCI likely to ban Chinese companies from bidding for IPL Title sponsorship rights cricket news in marathi
Shikhar Dhawan : शिखर धवनला सहन होईना लेकराचा विरह...

टायटल स्पॉन्सरशिपची मूळ किंमत प्रति वर्ष 360 कोटी रुपये आहे, त्यानंतर बोलीच्या आधारे निविदा दिली जाईल. मात्र बीसीसीआयने कोणत्याही देशाचा किंवा ब्रँडचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. BCCI चा हा निर्णय लोकांच्या प्रतिक्रिया आणि चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo च्या नकारात्मक अनुभवामुळे घेतल्याचे मानले जात आहे.

यापूर्वी चिनी फोन कंपनी विवो ही आयपीएलची प्रायोजक होती, परंतु 2020 मध्ये भारत-चीन सीमेवर परिस्थिती बिघडली तेव्हा बीसीसीआयने विवोला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि टाटा एक वर्षासाठी टायटल स्पॉन्सर म्हणून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.